Osmanabad crime news उस्मानाबाद : स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजाला (Eknath Lomate Maharaj) अखेर पोलिसांनी अटक केली आहे. महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी फरार असलेल्या महाराजाला अखेर ४५ दिवसांनी पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने लोमटे महाराजाने महिला भक्ताचा विनयभंग केला असल्याची तक्रार एका महिलेने येरमाळा पोलीस ठाण्यात (yeramal police) केली होती. महिलेने केलेल्या तक्रारीनंतर अखेर स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होण्याची चाहूल लागताच महाराज पसार झाला होता. दरम्यान, महाराजाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. दैवी चमत्कारामुळे राज्यभर प्रसिद्ध असणारे कळंब तालुक्यातील (kalamb taluka) मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराजाविरोधात २८ जुलै २०२२ रोजी पीडित भक्त महिलेनं तक्रार दाखल केली होती. (eknath lomte maharaja arrested after 45 days)
अधिक वाचा ; Icc t-20 rankingमध्ये कोहली आणि वनिंदु हसरंगाची मोठी झेप
स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराज यांचा कळंब तालुक्यातील मलकापूर येथे लोमटे महाराज यांचा मठ आहे. या मठात लोमटे महाराजांचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक भक्त येत असतात. एवढचं नाही तर महाराज यांचा राज्यभर मोठा भक्तवर्ग असून या मध्ये विविध पक्षांचे बडे नेते ही महाराज यांचे भक्त आहेत. आपल्या दैवी शक्तीने महाराज आजारी व्यक्ती आणि भक्ताला बरे करतात अशी महाराज यांची ख्याती आहे. लोमटे महाराजांवर एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर ते फरार होते. दरम्यान, लोमटे महाराजांन किती महिला भक्तांची फसवणूक केली हे तपासात उघड होईल, असं पोलिसांनी सांगितलं. लोमटे महाराजा याच्यावर या पूर्वीही जादूटोणा व लोकांना फसवल्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
अधिक वाचा ; पाकिस्तानविरुद्ध कॅच सुटल्यावर अर्शदीपने पाठवला होता मेसेज
अशी घडली घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत महिलेने सदर प्रकरणाची व्हिडीओ क्लिप महाराजांजवळ असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, महाराजांनी म्हटलं की, मागील वेळी तू दर्शनासाठी आली होती तेव्हा तुझ्यावर बलात्कार केला होता. त्याची व्हिडिओ क्लिपही (Video Clip) माझ्याकडे असल्याची धमकी महाराजांनी महिलेला दिली असल्याचा दावा महिलेने केला आहे. सदर पिडीत महिला २८ जुलै रोजी मठात दर्शनासाठी आली असता महाराजांनी तिचा विनयभंग केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.
अधिक वाचा ; वयाच्या 45 वर्षानंतर महिलांना जाणवते 'या' गोष्टीची कमतरता
मलकापूर येथील लोमटे महाराज हे सतत वादाच्या भवऱ्यात असतात. त्यांच्याविरोधात याअगोदर देखील अनेक तक्रारी असल्याची माहिती मिळाली आहे. तसचं सदर प्रकरणातील महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार, ती २८ जुलै रोजी दुपारच्या वेळी एकनाथ सुभाष लोमटे महाराजांच्या दर्शनासाठी मलकापूर येथील मठात गेली होती. यावेळी सदर प्रकार घडला असल्याचं महिलेने म्हटलं आहे.
महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सदर प्रकरणात लोमटे महाराजांविरोधात अनके कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कलम ३५४, ३५४ अ, ३४१, ३२३, ५०४ व ५०६ नुसार येरमाळा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महाराजांविरोधात आधीदेखील अनेक फुसवणुकीच्या तक्रारी आहेत. मात्र राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली नाही.