Eknath shinde 'सभेसाठी पैसे देवून गर्दी जमवली जातेय' ठाकरे गटाने केलेल्या आरोपावर स्वतः एकनाथ शिंदे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Eknath Shinde's reaction to the serious allegation made by Shiv Sena : शिवसेनेने केलेल्या आरोपावर आज स्वतः एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सभेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “ ही गर्दी काय पैसे देवून जमवण्यात आली नाही तर ही सर्व लोकं प्रेमाने या सभेला आले आहेत” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Eknath Shinde's reaction to the serious allegation made by Shiv Sena
शिवसेनेने केलेल्या गंभीर आरोपावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रय  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेने केलेल्या आरोपावर आज स्वतः एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली
  • “ ही गर्दी काय पैसे देवून जमवण्यात आली नाही"
  • सर्व लोकं प्रेमाने या सभेला आले आहेत - एकनाथ शिंदे

औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे जाहीर सभा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होणाऱ्या सभेची खूप दिवसांपासून जोरदार तयारी सुरु होती. शिंदे यांच्या होणाऱ्या सभेवर ठाकरे गटातील नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका करत म्हटलं होत की, शिंदे यांच्या सभेला पैसे देवून गर्दी जमवली जात आहे. संदीपान भुमरे यांनी हे पैसे वाटल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. दरम्यान, सदर प्रकरणी एक ऑडीओ क्लिप देखील व्हायरल झाली होती. शिवसेनेने केलेल्या आरोपावर आज स्वतः एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सभेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “ ही गर्दी काय पैसे देवून जमवण्यात आली नाही तर ही सर्व लोकं प्रेमाने या सभेला आले आहेत” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

अधिक वाचा : इतका फॅन की कोहली या क्रिकेटरला भेटायला गेला सकाळी ५ वाजता

बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना कोणती याचं उत्तर या सभेने दिले आहे

दरम्यान , पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “ बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना कोणती आहे याचं उत्तर आज या विराट सभेने दिले” असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. माता – भगिनी आज सकाळी ११ वाजल्यापासून सभेसाठी बसल्या आहेत, मी त्यांचे धन्यवाद देतो, पुरुषांना देखील धन्यवाद दिले पाहिजे कारण ते देखील मोठ्या संखेने सभेला आले आहेत. असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा : हिरव्यागार मिरच्याचं चटपटीत लोणचं, वाचा स्पेशल रेसिपी 

“भुमरेंनी त्यांना मिळालेल्या ५० खोक्यातून सभेसाठी पैसे वाटप केले आहेत,” -चंद्रकात खैरे

आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे जाहीर सभा होत आहे. या सभेला गर्दी जमवण्यासाठी प्रत्येकी २५०-३०० रुपये दिल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर निशाणा साधला आहे.  “भुमरेंनी त्यांना मिळालेल्या ५० खोक्यातून सभेसाठी पैसे वाटप केले आहेत,” असा आरोप चंद्रकांत खैरें यांनी केला आहे. दरम्यानं, मागील सभेत केवळ २५ खुर्च्या होत्या, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुश करण्यासाठी भुमरे हे करत असल्याचं देखील खैरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, पुढे बोलताना खैरे म्हणाले की, . मागील वेळी शिंदे आले तेव्हा केवळ २५ खुर्च्या होत्या. त्यामुळे, एकनाथ शिंदे हे भुमरे यांना म्हणाले असतील की, हे काय लावलं आहे. म्हणून आता मुख्यमंत्री शिंदेंना खूश करण्यासाठी बंडखोर आमदार आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी मोठ्या सभेची घोषणा केली असल्याचं देखील खैरे यांनी म्हटलं आहे. त्या सभेसाठी गर्दी करण्यासाठी अंबड, घनसावळी, पाथर्डी आणि संभाजीनगरच्या बाहेरील तालुक्यांमधून फोन आले, असल्याचं देखील खैरे म्हणाले.

अधिक वाचा : लाशों की ढेर बिछा दुंगा, माथेफिरू प्रेमीची धमकी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी