बीड ; प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपला मुलगा इंग्रजी शाळेत शिकावा. या इच्छेनेच आई – वडिलांनी आपल्या मुलाला इंग्रजी शाळेत घातले होते. मात्र, आई-वडील एचआयव्ही बाधित असल्याने निगेटिव्ह मुलाला प्री प्रायमरी इंग्रजी शाळेत प्रवेश नाकारल्याचा संतापजनक प्रकार बीडच्या पाली येथे घडला आहे. सदर प्रकारामुळे जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींना जीवन जगताना अगोदरचं नरक यातना भोगाव्या लागत असतात. यातच त्यांच्या मुलासोबत असा प्रकार घडत असल्याने मोठी त्यांच्यावर मोठ संकट ओढवले जात असल्याचं बोललं जात आहे.
अधिक वाचा ; घर खरेदी करण्यापूर्वी या गोष्टींची घ्या काळजी होईल भरभराट
सदर घटने विषयी अधिक माहिती अशी आहे की, इंग्रजी शाळेत आपला मुलगा शिकावा, यासाठी आई आणि वडीलांनी मुलाला इंग्रजी शाळेत शिकण्यासाठी परिवर्तन इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेण्यात आला. शाळेची फीस देखील भरण्यात आली. मुलगा देखील शाळेत दररोज जात होता. दीड महिना मुलाला शाळेने शिकवले. मात्र अचानक तुमच्या मुलाला शाळेत पाठवू नका, असं शाळा प्रशासनाने मुलाच्या पाल्यांना सांगितले. शाळेने आपल्या मुलाला शाळेत पाठवू नका असं संगीतल्यावर मुलाच्या आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. विशेष म्हणजे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आपल्या मुलाला पाठवता आलं नाही याचं देखील खूप वाईट वाटलं असल्याचं मुलाच्या आई वडिलांनी म्हटलं आहे.
अधिक वाचा ; ब्लॅक होलमधून निघणारा 'भयानक' आवाज नासाने केला रेकाॅर्ड
याविषयी बोलताना, मत इन्फट इंडिया प्रकल्पाचे संचालक दत्ता बारजगे यांनी म्हटलं आहे की, एचआयव्हीबाधित आई-वडिलांच्या समाजाकडून मुलाला दिली गेलेली वागणूक हिणकस आहे. पाच वर्षाच्या मुलाचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेतला जातो हे दुर्दैव असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. यासंदर्भात परिवर्तन प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या संचालक आणि शिक्षकांना विचारणा केली असता आम्ही मुलाला कोणतीही हीन वागणूक दिली नसल्याचे शाळा प्रशासांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर मुलाचे फोटो विडिओ आमच्याकडे असल्याचे शाळेने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, शाळा मुलाला शिकवण्यास तयार असली तरी इतर पालक मात्र आक्रमक झाले असल्याची माहिती आहे. तो मुलगा शाळेत येणार असेल तर आमची मुलं पाठवणार नसल्याचं इतर मुलांच्या पालकांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाने मदत करावी मागणी शाळेचे संचालक अशोक शिंदे यांनी केली आहे.
अधिक वाचा ; आज आहे नील आर्मस्ट्रॉंग यांची पुण्यतिथी, वाचा आजचे दिनविशेष