Chandrakant Khaire : राजकीय कारकीर्दीला ३२ वर्षे उलटली तरीही मुंबईत घर मिळाले नाही, चंद्रकांत खैरे यांनी बोलून दाखवली मनातील खंत

Even after 32 years of political career, but not get a house in Mumbai : औरंगाबादचे शिवसेनेचे माजी खासदार आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, आमदार आणि गृहनिर्माण मंत्रीपद भूषवूनही मला मुंबईत घर नाही. आज मागे वळून पाहिले असता ३२ वर्षे उलटले तरीही मुंबईत तसा मी बेघरच आहे. ‘मुंबईत अद्याप घर न मिळाल्याची खंत मला अजूनही सतावतेय - खैरे

chadrakant khaire
चंद्रकांत खैरे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राजकीय कारकीर्दीला ३२ वर्षे उलटली तरीही मुंबईत घर मिळाले नाही - खैरे
  • मुंबईत अद्याप घर न मिळाल्याची खंत मला अजूनही सतावतेय –चंद्रकांत खैरे
  • आज मागे वळून पाहिले असता ३२ वर्षे उलटले तरीही मुंबईत तसा मी बेघरच आहे - खैरे

Chandrakant Khaire : औरंगाबाद :  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३०० आमदारांना घरे देणार असल्याचं म्हटलं होत. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने ठाकरे सरकारला चांगलचं धारेवर धरले होते. दरम्यान, आता शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य समोर आलं आहे. राजकीय कारकीर्दीला ३२ वर्षे उलटली तरीही मुंबईत घर मिळाले नाही. आता मागे वळून पाहताना मुंबईच्या बाबतीत आपण बेघर असल्याची खंत वाटतेय, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे माजी खासदार आणि एके काळचे गृहनिर्माण मंत्री देखील होते. मात्र, राजकीय कारकीर्दीला ३२ वर्षे उलटली तरी मुंबईत आपल्याला घर मिळाले नसल्याची आपल्या मनातील खंत चंद्रकांत खैरे यांनी बोलून दाखवली आहे. एकीकडे भाजप सरकारला घर देण्याच्या मुद्द्यावरून निशाणा साधत असतानाचं शिवसेनेतीलचं नेते अशा प्रकारचे वक्तव्य करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अधिक वाचा : सनरुफवाली Maruti Brezza आली, जाणून घ्या कारची वैशिष्ट्ये

मुंबईत अद्याप घर न मिळाल्याची खंत मला अजूनही सतावतेय –चंद्रकांत खैरे

औरंगाबादचे शिवसेनेचे माजी खासदार आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, आमदार आणि गृहनिर्माण मंत्रीपद भूषवूनही मला मुंबईत घर नाही. आज मागे वळून पाहिले असता ३२ वर्षे उलटले तरीही मुंबईत तसा मी बेघरच आहे. ‘मुंबईत अद्याप घर न मिळाल्याची खंत मला अजूनही सतावतेय. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात लवकरच घर मिळणार आहे. त्यामुळे आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत,’ असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.

अधिक वाचा : अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास लगेचच करा ही ३ कामे, मिळेल आराम

माझ्यासारखे काही आमदार आहेत ज्यांना मुंबईत स्वतःचे घर आहे - प्रणिती शिंदे 

आम्ही लोकांसाठी राजकारणात आलोय, त्यामुळे ज्यांना गरज नाही त्यांनी घर घेणे चुकीचे ठरेल. यामुळे मी इतर आमदारांना आवाहन करते की त्यांनी यावरील हक्क सोडावा. मुंबईत आमदारांना देण्यात येणारे स्वीकारणार नसल्याची प्रतिक्रिया आमदार प्रणिती शिंदेंनी दिली आहे. आमदारांना मिळणाऱ्या घरांविषयी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, माझ्यासारखे काही आमदार आहेत ज्यांना मुंबईत स्वतःचे घर आहे. त्यामुळे मला या घराची गरज नाही. याऊलट सध्या असलेल्या आमदार निवासाचा वापर देखील माझ्या मतदार संघातील गरजू व्यक्ती त्यासोबत रुग्ण देखील वापरत आहेत. याचा मला मनापासून आनंद असल्याचे देखील प्रणिती शिंदे म्हणाल्या. माझ्यासारख्या ज्या आमदारांनी घर नकोय असं म्हटलं त्या घराचा वापर लोकांसाठी तसेच औषधोपचारासाठी करावा असे देखील प्रणिती शिंदे म्हणाल्या.

अधिक वाचा : घरात या दिशेला पायऱ्या बनवल्यास होईल वित्तहानी 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी