Ashok Chavan :माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण कॉंग्रेस सोडण्याच्या तयारीत? 'हे' असून शकत कारण, मात्र......

Ashok Chavan preparing to leave the congress party? : बहुमत चाचणीवेळी गैरहजर असलेल्या आमदारांवर हायकमांडनेही पक्षशिस्त मोडल्याच्या आरोपाखाली या ११ आमदारांवर कडक कारवाई करणार असल्याचं सांगितलं होत. यानंतर हे आमदार नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. सदर घडामोडीनंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे थेट कॉंग्रेसला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

Ashok Chavan preparing to leave the congress party?
अशोक चव्हाण कॉंग्रेस सोडण्याच्या तयारीत? 'हे' असून शकत कारण  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण कॉंग्रेस सोडणार?
  • अशोक चव्हाणांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत
  • मी पक्ष सोडण्याचा कुठलाही निर्णय घेतला नाही

नांदेड : एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेसोबत बंड करत आपला दुसरा गट स्थापन केला आहे. दरम्यान, शिंदे यांनी आपला गट स्थापन करत राज्याचे मुख्यमंत्री देखील झाले. सदर घटनेनंतर राज्यात मोठ्या घडामोडी होताना दिसत आहेत. राजन पाटील यांच्यासह बबनदादा शिंदे हे देखील राष्ट्रवादीला रामराम ठोकण्यार आहेत. दरम्यान, सध्या यापेक्षा मोठी चर्चा ही कॉंग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांची आहे. अशोक चव्हाण हे आता कॉंग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, या चर्चांना स्वतः अशोक चव्हाण यांनी पूर्णविराम देत स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे. (ex chief minister and congress leader may leave party )

अधिक वाचा ; पोलीस कर्मचाऱ्याच्या गाण्यानं बाबा बनले 'यमला पगला दीवाना'

अशोक चव्हाणांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत

दरम्यानं, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बहुमत चाचणीला कॉंग्रेसचे तब्बल ११ आमदार गैरहजर होते. या गैरहजर आमदारांमध्ये अशोक चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार प्रणिती शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांचा समावेश होता. गैरहजर असलेल्या आमदारांवर हायकमांडनेही पक्षशिस्त मोडल्याच्या आरोपाखाली या ११ आमदारांवर कडक कारवाई करणार असल्याचं सांगितलं होत. यानंतर हे आमदार नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. सदर घडामोडीनंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे थेट कॉंग्रेसला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु मात्र अशोक चव्हाण यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. मी असा कुठलाही निर्णय घेतला नाही, असं स्पष्टीकरण स्वतः अशोक चव्हाण यांनी दिले आहे.

अधिक वाचा : ऐकलं का! शिंपीही बनतो देशाचा अभिमान, अचिंतनं केलंय शिवणकाम

नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण?

अशोक चव्हाण यांनी स्वतः स्पष्टीकरण देत म्हटलं आहे की, मी पक्ष सोडण्याचा कुठलाही निर्णय घेतला नाही. तसचं जिल्हाभरात सुरु असलेल्या चर्चांना मी महत्व देखील देत नसल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे. अशोक चव्हाण यांनी या विषयावर जास्त भाष्य करण देखील टाळलं आहे. दरम्यान, बहुमत चाचणीच्या वेळी अशोक चव्हाण अनुपस्थितीत होते. त्यावरून काँग्रेस पक्षातूनच त्यांची कोंडी केली जात आहे, त्यामुळे अशोक चव्हाण नाराज असल्याचं म्हटलं गेलं. याच पार्श्वभूमीवर चव्हाण पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. मात्र ही चर्चा स्वतः अशोक चव्हाण यांनीच फेटाळून लावली असली तरी अशोक चव्हाण पक्ष सोडणार असल्याची जिल्हाभरात चर्चा आहे हे मात्र नक्की.

अधिक वाचा ; संजय राऊतांच्या अटकेनंतर 'सामना'चा पहिला अग्रलेख प्रसिद्ध 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी