Arjun Khotkar : जालना : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. अर्जुन खोतकर यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेत हा निर्णय घेतला आहे. यावेळी ते प्रचंड भावूक झाले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या परवानगीने, परिवारासाठी मी हा निर्णय घेतोय, हे सांगताना त्यांचे डोळे भरून आल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, खोतकर अनेक दिवसांपासून शिंदे गटात सामील होणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र, खोतकर यांनी काल सांगितले होते की, मी माझा निर्णय उद्या पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे. दरम्यान ,त्यांनी आज जालना येथे पत्रकार परिषद घेत आपण आजपासून शिंदे गटाचं समर्थन करणार असल्याचं सांगितले आहे. (ex minister and shivsena leader Arjun Khotkar cried and supported cm Eknath Shinde)
अधिक वाचा : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शिंदे सरकारचे मंत्री शपथ घेणार
अर्जुन खोतकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत म्हटलं की, मी अत्यंत इमानइतबारीने पक्षाची सेवा करत आलो आहे. माझ्यासोबत अनेक सहकाऱ्यांनी जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन वाढवले. पक्ष नेतृत्वाचे देखील मी मनापासून आभार मानतो की, त्यांनी माझ्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी मी देखील समर्थपने पार पडली. पुढे बोलताना खोतकर म्हणाले की, जिल्ह्यात ज्या काही घडमोडी झाल्या या आपणास माहिती आहेत. या संदर्भात मी मुख्यमंत्री यांना भेटलो असता त्यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. माझ्या भागातील काही प्रकल्पासंदर्भात देखील मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. याब्ब्द्ल देखील मुख्यमंत्री यांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे.
अधिक वाचा ; गुजराती आणि राजस्थानींमुळे मुंबई आर्थिक राजधानी - कोश्यारी
पुढे बोलताना खोतकर म्हणाले की, या संदर्भात माझे उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर बोलणे झाले असून, संजय राऊत यांच्याशी देखील मी बोललो आहे. मी ४० वर्षाचा सच्चा शिवसैनिक आहे. मात्र, घरी आलं की माझा परिवार दिसतो. त्यामुळे काही निर्णय करणे गरजेचे आहेत. मी पक्षप्रमुखांकडे परवानगी मागितली आहे आणि पक्षप्रमुख या संदर्भाने मला जे काही बोलयाचे आहे ते बोलले आहेत. मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने मी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे. काही परस्ठीतीनुसार मला हा निर्णय घ्यावा लागतोय असं अर्जुन खोतकर यांनी म्हटलं.
अधिक वाचा ; जेआरडी टाटा एअर इंडियामधील टॉयलेट पेपर बदलायचे, धूळ पुसायचे