औरंगाबादचं नाव बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हाचं बदललंय, एमआयएम खासदार जलील यांना देखील इशारा

शिवसेनाप्रमुखांनी ज्या दिवशी घोषणा केली त्याच दिवशी नाव बदललं, आता फक्त सोपस्कार बाकी राहिला आहे - चंद्रकांत खैरे

ex shivasena mp chandrakant khaire targeted mim mp jaleel and congress
औरंगाबादचं नाव बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हाचं बदललंय  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शहराचे नाव बदलण्यापेक्षा पायाभूत सुविधांचा विकास व्हावा – कॉंग्रेस
  • एका सरकारी परिपत्रकात औरंगाबाद शहराचा उल्लेख थेट संभाजीनगर
  • ज्या अधिकाऱ्यांनी जीआरमध्ये हे नामकरण केलं, त्याचा सत्कार करायला हवा – संजय राऊत

औरंगाबाद : शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एक मोठ वक्तव्य केल आहे.  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या दिवशी घोषणा केली त्याच दिवशी नाव बदललं, आता फक्त सोपस्कार बाकी राहिला आहे. दरम्यान, औरंगाबाद शहराचं नाव आधीच बदललं असल्याचं देखील चंद्रकांत खैरे यांनी म्ह्टलं आहे. त्याचबरोबर खैरे यांनी औरंगाबाद जिल्ह्याचे एमआयएमचे खासदार यांना देखील इशारा देत म्हटलं आहे की, इम्तियाज जलील काहीही बोलतो, हिंमत असेल तर मैदानात येऊन दाखवावं, आम्ही या शहराचं नाव बदलणारच आहोत असा आक्रमक पवित्रा माजी खासदार खैरे यांनी घेतल्याने पुन्हा नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. दरम्यान, खैरे यांच्या या विधानानंतर जलील नेमकं काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहराचे नाव बदलण्यापेक्षा पायाभूत सुविधांचा विकास व्हावा – कॉंग्रेस

याअगोदर देखील कॉंग्रेसने फक्त शहराचे नाव बदलण्यापेक्षा पायाभूत सुविधांचा विकास व्हावा अशी भूमिका काँग्रेससारख्या पक्षांनी घेतलेली आहे. मात्र, औरंगाबाद शहराच्या नावावरुन मागील कित्येक वर्षांपासून मोठा वाद आहे. शिवसेना तसेच भाजपसारखे हिंदुत्ववादी पक्ष औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करतात. तर काँग्रेससारख्या पक्षाने औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याला विरोध केलेला आहे.

एका सरकारी परिपत्रकात औरंगाबाद शहराचा उल्लेख थेट संभाजीनगर

दरम्यान,  एक नुकतीच घडलेली घटना म्हणजे एका सरकारी परिपत्रकात औरंगाबाद शहराचा उल्लेख थेट संभाजीनगर अस करण्यात आला आहे. त्यामुळे, आता या घडलेल्या वेगळ्याच प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली असून या घटनेला राजकीय रंग देण्याच काम सध्या राजकारणी करत असल्याच दिसत आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी या घटनेसंदर्भात  आक्रमक पवित्रा धरण केला असून, जलील यांनी हिंमत असेल तर शहराचं नाव बदलून दाखवा, असं म्हणत थेट आव्हान दिलं आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी हे परिपत्रक काढलं त्याने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीदेखील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

ज्या अधिकाऱ्यांनी जीआरमध्ये हे नामकरण केलं, त्याचा सत्कार करायला हवा – संजय राऊत

जीआरमध्ये औरंगाबादचं संभाजीनगर नाव, याचं स्वागत आहे. औरंगाबादच्या नामकरणासंदर्भात बोलताना संजय राऊत यांनी ज्या अधिकाऱ्यांनी जीआरमध्ये हे नामकरण केलं, त्याचा सत्कार करायला हवा, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

एमआयएमचं ऐकून राज्य चालत नाही – संजय राऊत

औरंगाबादचं संभाजीनगर करून दाखवा, कधी झालं त्यांना हे कळलंचं नाही. असा टोला राऊत यांनी एमआयएमला लगावला आहे.  एमआयएमचं ऐकून राज्य चालत नाही, एमआयएमचा आणि औरंगाबादचा संबंध काय? बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः जाहिरसभे औरंगाबादचं संभाजीनगर  नामकरण केलं आहे. असं देखील संजय राउत यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी