Pipanri Chinchwad Police Recruitment : हायटेक कॉपीची भुरळ , पोलिस कॉन्स्टेबलला अटक, मोठ्या रॅकेटचा होणार पर्दाफाश

औरंगाबाद
Updated Dec 24, 2021 | 13:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

Exam scam police costabale rahul gaikwads arrest : सिटी चौक पोलीस स्टेशनमधील कॉन्स्टेबल राहूल याच्या नातेवाईकांची चौकशी पोलिसांनी केली. पोलिसांनी केलेल्या या चौकशीतून अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. गायकवाडच्या सासऱ्याचे राहुलसह दोन जाईव, मुलगा आणि सून पोलीस दलात आहेत अशी माहिती सामोर आले आहे

Exam scam police costabale rahul gaikwads arrest
हायटेक कॉपीची भुरळ , पोलिसा कॉन्स्टेबलला अटक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राहुल गायकवाड हा सासऱ्यासोबत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी चालवत होता
  • गायकवाडच्या सासऱ्याचे राहुलसह दोन जाईव, मुलगा आणि सून पोलीस दलात आहेत
  • हायटेक कॉपीची मुळं ग्रामीण भागापर्यंत रुतलेली असल्याचे समोर आले आहे

Pipanri Chinchwad Police Recruitment औरंगाबाद ; औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल गायकवाड याला पिपंरी चिंचवड पोलीस भरतीच्या लेखी उमेदवारांना उत्तरे सांगितल्याप्रकरणी मंगळवारी अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी राहुल गायकवाडला अटक केल्यानंतर या गुन्ह्याचा सखोल तपास होईल असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या हायटेक कॉपीची मुळं ग्रामीण भागापर्यंत रुतलेली असल्याचे समोर आले आहे.  यासोबतच आणखी दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून या आरोपींच्या चौकशीतून अजूनच धक्कादायक माहिती उघड होत आहे. (Pipanri Chinchwad Police Recruitment: High-tech copy scam, police constable arrested, big racket to be exposed)

राहुल गायकवाड हा सासऱ्यासोबत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी चालवत होता

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या ७२० पदांसाठी राज्यात १९ नोव्हेंबरला भरती प्रक्रिया पार पडली. यावेळी हिंजवडी ठाण्याच्या हद्दीतील केंद्रात नितीन मिसाळ याच्या मास्कमध्ये इलेक्ट्रिक डिव्हाइस जप्त करण्यात आले. पोलीस त्याला पकडण्याच्या तयारीत असताना त्याने पळ काढला. तर, सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी राहुल गायकवाड हा २०१२ साली शहर पोलीस दलात भरती झालेला राहुल गायकवाड हा सासऱ्यासोबत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी चालवत होता अशी माहिती समोर आली आहे. तसेच त्याचे काही नातेवाईकही पोलीस दलात आहेत. हे सर्वजण ग्रामीण भागातील तरुणांना कॉपीच्या जाळ्यात खेचत असल्याचे समोर येत आहे. अधिक तपास केला असता, औरंगाबादमधील रामेश्वर शिंदे आणि गणेश वैद्य याने उत्तरे सांगण्यास मदत केल्याचे समोर आले. तसेच वैद्य याला उत्तरे सांगणाऱ्या राहुल गायकवाडला सिटी चौक पोलीस स्टेशनमधून अटक करण्यात आले.

गायकवाडच्या सासऱ्याचे राहुलसह दोन जाईव, मुलगा आणि सून पोलीस दलात आहेत

सिटी चौक पोलीस स्टेशनमधील कॉन्स्टेबल राहूल याच्या नातेवाईकांची चौकशी पोलिसांनी केली. पोलिसांनी केलेल्या या चौकशीतून अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. गायकवाडच्या सासऱ्याचे राहुलसह दोन जाईव, मुलगा आणि सून पोलीस दलात आहेत अशी माहिती सामोर आली असून, राहुल हा वैजापूर तालुक्यातील निमगावचा रहिवासी आहे. त्याच्या गावापासून पाच ते सहा किमी अंतरावर कोरडगावात त्याची सासुरवाडी आहे. राहुलच्या सासऱ्याची आधी शिऊर बंगला येथे भाड्याच्या जागेत छोट्याशा शेडमध्ये अकॅडमी होती. मात्र काही दिवसांपूर्वीच लोणी शिवारात स्वतःच्या जागेत आलिशान अकॅडमी उभी राहिली. सासरा शेतकरी असल्याचे सांगितले जाते. मग आता ही सुसज्ज अकॅडमी नेमकी कुणाची आहे, याचा तपास पोलीस घेत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी