रात्रीची लाईट, अन् पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

farmer died due to snake bite in beed ; बीड जिल्ह्यात एका शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शेतात रात्री पिकाला पाणी देत असताना तरुण शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

रात्रीची लाईट, अन् पिकाला पाणी देण्यासाठी गेला, झाला मृत्यू
farmer died due to snake bite in beed   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या सर्प दंश झाल्याने झाला मृत्यू
  • दिवसाची वीज शेतीसाठी द्यावी, शेतकऱ्यांमधून केली जात आहे मागणी
  • रामेश्वरला औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

बीड : रात्रीची लाईट शेतकऱ्यांना देणे हे शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरू शकतो. मात्र, तरीदेखील महावितरणाकडून शेतीसाठी रात्रीचा वीज पुरवठा दिला जात आहे. आपली पिके वाळू नये म्हणून शेतकरी देखील रात्रीच्या अंधारात आपल्या जीवाची पर्वा न करता पाणी द्यायला जातात. अनेकदा ही गोष्ट शेतकऱ्यांच्या जीवावरही बेतत आहे. अशातच बीड जिल्ह्यात एका शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शेतात रात्री पिकाला पाणी देत असताना तरुण शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका गावात ही घटना घडली असून, रामेश्वर भागवतराव लोणकर असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे. या घटनेनंतर नागरिकांनी महावितरणाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

अधिक वाचा ; इलॉन मस्क बोलतच राहिले आणि कर्मचाऱ्यांनी सोडल्या नोकऱ्या

दिवसाची वीज शेतीसाठी द्यावी, शेतकऱ्यांमधून केली जात आहे मागणी

दरम्यान, यापूर्वी देखी; रात्रीचा वीजपुरवठा असल्याने अनेक शेतकरी हे रात्रीच्या अंधारात पिकांना पाणी देण्यासाठी गेले असता वीजेच्या धक्क्याने किंवा सर्पदंशाने अनेक शेतकऱ्याचे  मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा समोर येतात. मात्र, तरीही सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. रामेश्वर लोणकरच्या मृत्यूनंतर शेतासाठी रात्रीची वीज देवून महावितरण किती शेतकऱ्यांचा जीव घेणार? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. त्याचबरोबर महावितरणवर रोष देखील व्यक्त केला जात असल्याचे पहायला मिळत आहे. महावितरणाकडून शेतीसाठी रात्री वीज पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांच्या जीवा जात असल्याने दिवसाची वीज शेतीसाठी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

अधिक वाचा ; Rip Twitter: मस्कला झालंय तर काय? शेअर केली ट्विटरची कबर 

रामेश्वरला औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रामेश्वर लोणकर याला रात्री पिकांना पाणी देत असताना सर्पदंश झाला. तात्काळ त्याला औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु दुर्दैवाने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रामेश्वरच्या मृत्यूनंतर शेतकरी हे आक्रमक झाल्याचे पहायला मिळत असून, रात्रीची लाईट बंद करून दिवसा लाईट देण्याची मागणी शेतकरी करत असताना पहायला मिळत आहेत.

अधिक वाचा ; FIFA World Cup 2022:पाहा कुठे आणि कधी पाहू शकाल लाईव्ह सामने

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी