farmer leader targeted central and state government : उस्मानाबादेत सरकारची 'मूठमाती', विमा कंपनीचे अधिकारी जिथे दिसतील तिथे डांबून ठेवू , सरकारला इशारा

farmer leader targeted central and state government : विमा कंपनीने गतवर्षी सुद्धा शेतकऱ्यांना विमा दिलेला नाही यावर्षी विमा कंपनीने शेतकऱ्यांकडे साफ दुर्लक्ष करत विमा देण्यासाठी टाळाटाळ केल्याचे स्पष्ट असतानासुद्धा दोन्ही सरकारकडून मात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न देखील केला नाही

farmer leader targeted central and state govermnet
विमा कंपनीचे अधिकारी जिथे दिसतील तिथे डांबून ठेवू  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • विमा कंपनीचे अधिकारी जिथे दिसतील तिथे डांबून ठेवू
  • विमा कंपनीने शेतकऱ्यांकडे साफ दुर्लक्ष करत विमा देण्यासाठी टाळाटाळ केली
  • अतिवृष्टीमुळे शेतकरी हा प्रचंड आर्थिक अडचणीत असताना सुद्धा केंद्र व राज्य सरकार यांनी कसलाच विचार केला नाही

farmer leader targeted central and state government | उस्मानाबाद : विमा कंपनीचे अधिकारी जिथे दिसतील तिथे डांबून ठेवू असा इशारा शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष रामजीवन बोंदर यांनी दिला आहे. रामजीवन बोंदर हे आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.

ते उस्मानाबाद जिल्ह्यातील सांजा या गावात केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या वतीने आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी मुठमाती कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी  त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला हा इशारा दिला आहे. पुढे बोलताना बोंदर म्हणाले की उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हा प्रचंड आर्थिक अडचणीत असताना सुद्धा केंद्र व राज्य सरकार यांनी कसलाच विचार न करता तुटपुंजी मदत देऊन बोळवण केली असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

विमा कंपनीने शेतकऱ्यांकडे साफ दुर्लक्ष करत विमा देण्यासाठी टाळाटाळ केली

विमा कंपनीने गतवर्षी सुद्धा शेतकऱ्यांना विमा दिलेला नाही यावर्षी विमा कंपनीने शेतकऱ्यांकडे साफ दुर्लक्ष करत विमा देण्यासाठी टाळाटाळ केल्याचे स्पष्ट असतानासुद्धा दोन्ही सरकारकडून मात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न देखील केला नाही. शेतकऱ्यांनी हजारो कोटी विमा भरलेला असताना देखील सरकारकडून दिलेली नुकसान भरपाई अत्यंत तुटपुंजी आहे.

शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले असून, डिसेंबर अखेरपर्यंत विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा जमा केला नाही तर विमा कंपनीचे अधिकारी जिथे दिसतील तिथे डांबून ठेवण्याचा इशारा रामजीवन बोंदर यांनी दिला असून सरकारच्या विरोधात सुद्धा मोठे आंदोलन उभा करणार असल्याचे त्यांनी यावेळी त्यांनी म्हटलं आहे.

 

या मूठमाती कार्यक्रमात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ जाधवर युवक जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख जिल्हा कार्याध्यक्ष श्याम लावंड कळंब तालुका अध्यक्ष विनोद बिक्कड पवन बाराते जिल्हा ऊसतोड कामगार अध्यक्ष संतोष राठोड उस्मानाबाद तालुका अध्यक्ष प्रशांत सूर्यवंशी संदीप माळकर, बालाजी मोहिते, प्रमोद सूर्यवंशी, सुहास नायकल प्रदीप नायकल, इरफान शेख, अविनाश नायकल, हरिचंद्र गिरी , शिवाजीराव काळे,  दत्तू पाटील सानप जोशी भारत पाटील अंगद मुळे लक्ष्मण लोंढे राजेश कदम लक्ष्मण कदम युवराज वाघमारे ॲड. नेताजी गरड यांचेसह शेतकरी सहभागी झाले होते

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी