Osmanabad : उस्मानाबादमध्ये शेतकरी आंदोलन पेटले, शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून टायर जाळले

औरंगाबाद
Updated Oct 27, 2022 | 15:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

Farmers' agitation flared up in Osmanabad ; कैलास पाटील यांच्या समर्थनात आज उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांनी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांना विमा, अतिवृष्टी अनुदान मिळावे या मागणीसाठी एकीकडे आमदार कैलास पाटील यांचे 4 दिवसापासून आमरण उपोषण सुरु आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे आक्रमक झाले आहेत.

Farmers' agitation flared up in Osmanabad
उस्मानाबादमध्ये शेतकरी आंदोलन पेटले, महामार्ग रोखून टायर जाळले   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आमदार पाटील हे गेल्या 4 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.
  • कैलास पाटील यांच्या समर्थनात सोलापूर औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गांवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले
  • खासदार स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त आहे.

उस्मानाबाद : पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना तात्काळ मिळावे, या मागणीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) गटाचे आमदार पाटील (Kailas Patil ) हे गेल्या 4 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा आणि अनुदानाचे पैसे येत नाहीत, तोपर्यंत उपोषणावरुन उठणार नसल्याचं आमदार कैलास पाटील यांनी, अशी ठाम भूमिका घेतली आहे. दरम्यान, कैलास पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले आहे. खासदार ओम राजे निंबाळकर आक्रमक, राष्ट्रीय महामार्गांवर रास्ता रोको करुन चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहे.

अधिक वाचा ; 'नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि PM मोदींचा फोटो असावा'

सोलापूर औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गांवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले

दरम्यान, कैलास पाटील यांच्या समर्थनात आज उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांनी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांना विमा, अतिवृष्टी अनुदान मिळावे या मागणीसाठी एकीकडे आमदार कैलास पाटील यांचे 4 दिवसापासून आमरण उपोषण सुरु आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे आक्रमक झाले आहेत. खासदार ओमराजे यांनी रस्त्यावर उतरत सोलापूर औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गांवर चक्का जाम केला आहे व सरकार व विमा कंपनीवर टीका केली आहे. आमदार पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 4 था दिवस आहे तर सारोळा या गावातील 7 शेतकऱ्यांनी स्वतःला खड्डे खोदून पुरून घेतले आहे.

अधिक वाचा ; राम मंदिराचे काम कोणत्या दिवसापर्यंत पूर्ण होणार, तारीख ठरली

 

खासदार स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त आहे.

राष्ट्रीय महामार्ग 1 तासापासून जाम करत उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी येथे रास्ता रोको केला असून शिवसैनिक यांनी आक्रमक होत जाळपोळ करायला सुरवात केली आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकार विरोधी घोषणा दिल्या आहेत. शिवसैनिक आक्रमक झाले असून जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलन करणयाचा इशारा दिला आहे. येडशी राष्ट्रीय महामार्ग वरील रास्ता रोको आंदोलनाने आक्रमक स्वरूप घेतले असून टायर जाळायला सुरुवात केली आहे, राष्ट्रीय महामार्ग 1 तासापासून चक्का जाम करण्यात आला. यावेळी, शिवसैनिक आक्रमक झाले असून जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलन करणयाचा इशारा दिला आहे.

अधिक वाचा ; खबरदार तुम्हालाही होऊ शकतो अर्धांगवायू? पाहा कारणे आणि उपाय

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी