शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या, पीकविम्याच्या पोर्टलवरून मराठवाड्यातील अनेक गावं गायब

Farmers' problems increased, many villages in Marathwada disappeared from the crop insurance portal : हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील अनेक गावांचा समावेश पिक विमा भरण्याचा यादीत करण्यात आला नाही. यामध्ये जवळा,धानोरा, चिंचोटी,वसपांगरा, खारबी, देवदरी, रहिमापूर, धुमका,गणगाव, कृष्णापुर या गावांचा समावेश आहे.

Farmer,  Maharashtra , Marathwada , crop insurance
पीकविम्याच्या पोर्टलवरून मराठवाड्यातील अनेक गावं गायब  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पिक विमा भरण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतोय
  • मराठवाड्यातील अनेक गावांचा समावेश पिक विमा भरण्याचा यादी करण्यात आला नाही
  • आमची गाव पिक विमा पोर्टल ला जोडावीत अन्यथा आंदोलन करू शेतकऱ्यांचा इशारा

औरंगाबाद : कुठल्याही पार्टीचे सरकार आले तरी शेतकऱ्यांच्या (Farmer) अडचणी काही होताना दिसत नाहीत. एकीकडे पावसामुळे शेतकऱ्यांची पिके वाया जाताना दिसत आहेत. तर दुसरीकडे पीक संरक्षण विमा भरण्यासाठी शेतकरी केंद्रावर जात असून तिथे देखील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना मराठवाड्यातील (marathawada) शेतकऱ्याना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. तर काही ठिकाणी सर्व्हर चालत नसल्याने शेतकऱ्यांना सीएससी केंद्र (Csc centre) चालकाकडे तासनतास ताटकळत बसावं लागत आहे. त्याचबरोर, मराठवाड्यातील अनेक गावांचा पीक विमा भरण्याचा यादीत समावेत नसल्याने पिक विमा भरण्यापासून वंचित राहावं लागत आहे. (Farmers' problems increased, many villages in Marathwada disappeared from the crop insurance portal)

मराठवायातील 'या' गावांचा समावेश पीक विमा भरण्याचा यादीत करण्यात आला नाही

हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील अनेक गावांचा समावेश पिक विमा भरण्याचा यादीत करण्यात आला नाही. यामध्ये जवळा,धानोरा, चिंचोटी,वसपांगरा, खारबी, देवदरी, रहिमापूर, धुमका,गणगाव, कृष्णापुर या गावांचा समावेश आहे. पिक विमा भरण्याचा यादीत करण्यात आला नाही. दरम्यान, वरील सर्व गाव पीक विमा पोर्टलला जोडलेली नसल्यामुळे शेतकरी विम्यापासून वंचित राहणार असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

आमची गावं विमा पोर्टलला जोडावीत, अन्यथा आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील अनेक गाव पिक विमा पोर्टलला जोडली गेली नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. आमची गावं विमा पोर्टलला जोडावीत, अन्यथा आंदोलनाचा इशारा कळमनुरी तालुक्यातील या शेतकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, दोन ते तीन वर्षांपासून पीक विमा मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्याचबरोर खरीप पिकांचा विमा भरण्यास दहा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. आणि अनेक गाव पिक विमा पोर्टलला जोडली नसल्याने शेतकरी पुढचा अडचणी सापडला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी