father committed suicide मुलीचं लग्न तोंडावर आलं असतांनाच मुलगी गेली पळून, समाजाला काय तोंड दाखवू म्हणत बापाची आत्महत्या, चिट्ठीत केला हा उल्लेख

father committed suicide in Aurangabad : सदर मुलीचे लग्न हे १९ नोव्हेंबर रोजी करायचे ठरले होते. घरात लग्नाची सर्व लगबग सुरु होती. सर्व नातेवाईकांना आमंत्रणे गेली, हॉल, केटरिंगची व्यवस्थाही झाली होती. आपल्या मुलीचे लग्न थाटा-माटात करण्याच्या तयारीत घरातील सर्व मंडळी होते.

father committed suicide in Aurangabad
मुलीचं लग्न तोंडावर आलं असतांनाच मुलगी गेली पळून  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सर्व नातेवाईकांना आमंत्रणे गेली, हॉल, केटरिंगची व्यवस्थाही झाली होती
  • बापाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती.
  • मुलीला पुन्हा घरात घेऊ नका बापाने केला चिट्ठीत उल्लेख

father committed suicide in Aurangabad  । औरंगाबाद : प्रत्येक बाप आपल्या मुलीला तीच लग्न करून माहेरी पाठवण्याचं स्वप्न आपल्या मनात रंगवत असतो. मात्र, मुलीने आपल्याचं जन्मदात्या बापासोबत काही दगाफटका केला तर तो दगाफटका बापाला सहन होऊ शकत नाही. हे मात्र खर आहे. दरम्यान, अशीच एक घटना औरंगाबाद येथे घडली आहे. घरात आपल्या मुलीचे लग्न अवघ्या ५ दिवसांवर येऊन ठेपले असल्याने बाप मुलीच्या लग्नाची सर्व तयारी करण्यात व्यस्त होता. मात्र, इकडे मुलीच्या मनात तर दुसराच विचार सुरु होता. अवघ्या ५ दिवसानंतर लग्न तोंडावर आले असताना मुलगी पळून गेली, आणि आता समाजात बदनामी होणार, लोकांना काय तोंड दाखवू या भीतीने मुलीच्या बापाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडलिया आहे. सदर घटना शनिवारी रात्री घडली असून, औरंगाबाद शहरातील संग्राम नगर उड्डाण पूलाजवळ घडलेल्या (Aurangabad suicide) या घटनेतील मृताची रविवारी सकाळी ओळख पटली. दरम्यान, बापाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत आपल्या मुलीला पुन्हा घरात घेऊ नका असं म्हटलं असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे औरंगाबाद शहरात (Aurangabad city) हळहळ व्यक्त होत आहे.

सर्व नातेवाईकांना आमंत्रणे गेली, हॉल, केटरिंगची व्यवस्थाही झाली होती

सदर मुलीचे लग्न हे १९ नोव्हेंबर रोजी करायचे ठरले होते. घरात लग्नाची सर्व लगबग सुरु होती. सर्व नातेवाईकांना आमंत्रणे गेली, हॉल, केटरिंगची व्यवस्थाही झाली होती. आपल्या मुलीचे लग्न थाटा-माटात करण्याच्या तयारीत घरातील सर्व मंडळी होते. मात्र मुलीचे दुसऱ्याच मुलावर प्रेम होते, याची माहिती वडिलांना नव्हती. ते मात्र, दोन दिवसांपूर्वी मुलगी घर सोडून निघून गेली. खूप शोधाशोध केल्यानंतर हताश वडिलांनी सातारा परिसर  पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. ऐन लग्न तोंडावर आल्यावर मुलीने उचललेल्या पावलामुळे संपूर्ण कुटुंब तणावाखाली होते. हा धक्का सहन न झाल्याने बापाने शनिवारी रात्री थेट संग्रामनगर उड्डाणपुलाखालील रेल्वे रुळावर झोकून देत आत्महत्या केली.

 

नेमकं चिठ्ठीत काय लिहिलं आहे?

आपली मुलगी पळून गेल्याचं प्रचंड दुख वडिलांना झाले होते. दरम्यान, त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या देखील केली. दरम्यान, त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पँटच्या खिशात एक चिट्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी पत्नीला उद्देशून लिहिले होते, ‘मी जग सोडून जात आहे. माझ्या मृत्यूनंतर मुलीला कधीही आपल्या घरात प्रवेश देऊ नको. माझ्या मुलाचे लग्न चांगले लाव. तू कायम आठवणीत राहशील,  मात्र त्या मुलीला आता माझ्या घरात स्थान नाही’. या मजकुराखाली सदर व्यक्तीने सही केली होती. जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी उड्डाण पुलाजवळ धाव घेतली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी