अखेर औरंगाबाद पोलिसांकडून 'या' अटी-शर्तींसह राज ठाकरेंच्या सभेला परवानगी

finally permission for raj thackeray meeting in aurangabad : गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला राज ठाकरे यांनी ३ मे रोजीचा अल्टिमेटम दिला असल्याने १ मे रोजी होणाऱ्या सभेमध्ये राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय आवाहन करतात यासाठी औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.

finally permission for raj thackeray meeting in aurangabad
पोलिसांकडून 'या' अटी-शर्तींसह राज ठाकरेंच्या सभेला परवानगी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज ठाकरे यांच्या सभेला अखेर औरंगाबाद पोलिसांनी परवानगी देण्यात आली
  • १ मे रोजी होणाऱ्या मनसेच्या सभेचा मार्ग मोकळा होणार
  • ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण करू नये, यासह काही अट घालून देण्यात आल्या

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला अखेर औरंगाबाद पोलिसांनी परवानगी देण्यात आली असल्याची माहिती अधिकृत सुत्रांकडून मिळाली आहे. सभेच्या परवानगीचे पत्र आज आयोजकांकडे दिले जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे १ मे रोजी होणाऱ्या मनसेच्या सभेचा मार्ग मोकळा होणार आहे. पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्यात येणार असली तरी काही अटी – शर्ती घालून देण्यात आल्या असल्याची माहिती मिळाली आहे. ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण करू नये, यासह काही अट घालून देण्यात आली असून, यासंदर्भात सभेआधी राज ठाकरेंना तशी नोटीस देखील दिली जाणर असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा होणार असल्याचे जाहीर केल्यावर मनसेने मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मनसेनं सभेची जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस देखील मोठा फौजफाटा तैनात करणार असल्याची माहिती आहे.

अधिक वाचा : गोरोबा काकांच्या पुण्यतिथीनिमित्त फोटो शेअर करून करा अभिवादन

सभेसाठी पोलिसांकडून या आहेत अटी-शर्तीं

१ )   मे रोजी महाराष्ट्र दिन असल्यानं धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये 

२ ) सामाजिक सलोखा बिघडेल, असं कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये

३ ) सभेच्या आधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही

४ ) लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी

५ ) सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये

६ ) इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. 

७ ) सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही

८ ) व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी

९ ) सभेला येणार्‍या लोकांनी घोषणा देऊ नयेत, जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडेल

१० ) वाहन पार्किंगचे नियम पाळावे

अधिक वाचा : शुक्रवार २८ एप्रिलचे राशीभविष्य, वाचा कसा जाईल आजचा दिवस 

औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला राज ठाकरे यांनी ३ मे रोजीचा अल्टिमेटम दिला असल्याने १ मे रोजी होणाऱ्या सभेमध्ये राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय आवाहन करतात यासाठी औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.

अधिक वाचा : महाराष्ट्रात ९५५ Corona Active, मास्कसक्तीच्या दिशेने वाटचाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी