Maharashtra Political Crisis : पोलीस ॲक्शन मोडमध्ये, आंदोलन करणाऱ्या ५० शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

In police action mode, 50 Shiv Sainiks protesting were charged : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर मराठवाड्यातील अनेक आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. आमदार शिंदे गटात सामील झाल्यावर शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले होते. कार्यकर्त्यांनी नांदेड जिल्ह्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्या विरोधात तीन दिवसांपासून निदर्शने केले आहे.

In police action mode, 50 Shiv Sainiks protesting were charged
पोलीस ॲक्शन मोडमध्ये, आंदोलन करणाऱ्या ५० शिवसैनिकांवर गुन्हे दाखल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदे यांनी शिवसेने विरुद्ध बंड केल्याने शिवसेनेला हा मोठा झटका
  • एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक
  • निदर्शेन आणि तोडफोड केलेल्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल

नांदेड : एकनाथ शिंदे यांनी शिवसेने विरुद्ध बंड केल्याने शिवसेनेला हा मोठा झटका मनाला जात आहे. त्यामुळे, गेल्या ३ दिवसांपासून शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाविरुद्ध आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. नांदेडमध्ये दोन दिवसापासून शिवसेनिकांनी आंदोलने केली आहेत, काही ठिकाणी तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी आता ५० शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवसैनिकांनी बंडखोरी केलेल्या आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड केली होती. दरम्यान,  शिवसेनेतील (shivsena) ४० आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे.

अधिक वाचा ; भाजपचा फॉर्म्युला ठरला; आता Eknath Shinde गटाची गरज नाही!

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्या विरोधात करण्यात आले होते निदर्शेने

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर मराठवाड्यातील अनेक आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. आमदार शिंदे गटात सामील झाल्यावर शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले होते. कार्यकर्त्यांनी नांदेड जिल्ह्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्या विरोधात तीन दिवसांपासून निदर्शने केले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी तोडफोड देखील केली आहे. याप्रकरणी आजी, माजी अध्यक्षांसह माजी आमदारांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नांदेडमध्ये निदर्शना दरम्यान, राडा घालणाऱ्या शिवसेनेचे (ShivSena) माजी आमदार, जिल्हा प्रमुखासह अनेक शिवसैनिकांत विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अधिक वाचा ; शंभूराज देसाईंनी सांगितलं शिंदें गटात सामील होण्याच कारण 

या आमदारांनी दिले आहे एकनाथ शिंदे यांना पाठींबा

एकनाथ शिंदे,  अब्दुल सत्तार नबी, प्रकाश सुर्वे, बालाजी कल्याणकर, संजय शिरसाठ, प्रदीप जयस्वाल, संजय रायमुलकर, संजय गायकवाड, विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे, श्रीनिवास वनगा, किशोरअप्पा पाटील, सुहास कांदे, चिमणआबा पाटील, सौ. लता सोनावणे, प्रताप सरनाईक, अनिल बाबर, शंभूराजे देसाई, महेश शिंदे, शहाजी पाटील, महेंद्र थोरवे, भरतशेठ गोगावले, महेंद्र दळवी, प्रकाश अबिटकर, डॉ. बालाजी किणीकर, ज्ञानराज चौगुले, प्रा. रमेश बोरनारे, तानाजी सावंत, संदीपान भुमरे, सौ. यामिनी जाधव, योगेश कदम, गुलाबराव पाटील, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, दीपक केसरकर, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत शिवसेनेच्या एकुण ३८ आमदारांनी बंडखोरी केली आहे. हे सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले असल्याने शिवसेनेला मोठा फटका बसला आहे.

अधिक वाचा : मंगळवार, २८ जून राशीभविष्य, वाचा कसा जाईल आजचा दिवस 

या अपक्ष आमदारांनी दिला एकनाथ शिंदे यांना पाठींबा?

सौ.मंजुळा गावित, विनोद अग्रवाल, सौ. गीता जैन, बच्चू कडू, राजकुमार पटेल, राजेंद्र यड्रावकर, चंद्रकांत पाटील, नरेंद्र भोंडेकर, किशोर जोरगेवार, अपक्ष ९ आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. एकनाथ शिंदे गटाला ४७ आमदारांनी पाठिंबा दिल्याने आता महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी