कार्यकर्त्याच्या पत्नीने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाही म्हणून केले मेसेज, बड्या नेत्यावर गुन्हा दाखल

fir filed against a big leader : आरोप करण्यात आलेल्या सदर संशयित आरोपीचे नाव माधव देवसरकर (Madhav Devsarkar) असं आहे. माधव देवसरकर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

fir filed against a big leader
फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाही म्हणून केले मेसेज  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • कार्यकर्त्याच्या पत्नीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्रास दिल्याचाही करण्यात आला आरोप
  • पीडित महिला घरासमोर उभी असताना तिला लज्जास्पद इशारेही केले
  • पत्रकार परिषद घेतल्यानंतर पोलिसांनी कायदेशीर कारवाईचं पाऊल उचललं

नांदेड : आपल्या एका कार्यकर्त्याच्या पत्नीला अश्लील इशारे केल्याचा आरोप एका बड्या नेत्यावर करण्यात आला आहे. दरम्यान, सदर नेत्यावर करण्यात आला आहे. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या (swabhimani sambhaji brigade) एका बड्या नेत्यावर गंभीर आरोप लावण्यात आले असून, सदर आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.  काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) माजी नगरसेवकानं (Former Corporator) आपल्या मित्राच्या पत्नीकडे शरीरसुखाची (Demand Sexual relation at friend's wife) मागणी केली असल्याची घटना समोर आली होती. या घटनेमुळे बरीच टीका करण्यात आली होती. ही घटना ताजी असताना आतानाच पुन्हा एका नेत्यावर अशा पद्धतीने आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे.

कार्यकर्त्याच्या पत्नीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्रास दिल्याचाही करण्यात आला आरोप

दरम्यान, आरोप करण्यात आलेल्या सदर संशयित आरोपीचे नाव माधव देवसरकर (Madhav Devsarkar) असं आहे. माधव देवसरकर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष आहेत. माधव देवसरकर यांनी आपल्या एका कार्यकर्त्याच्या पत्नीला अश्लील इशारे केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर करण्यात आला आहे. आरोपी देवसरकर याने स्वाभीमानी संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यकर्त्याच्या पत्नीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्रास दिला आहे. तसेच फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाही म्हणून तिला मेसेजही केले आहेत. याप्रकरणी सिडको ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR Lodged) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

पीडित महिला घरासमोर उभी असताना तिला लज्जास्पद इशारेही केले

याशिवाय सदर कार्यकर्त्याची पत्नी घरासमोर उभी असताना तिला लज्जास्पद इशारेही केल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी गेले पीडित महिला आणि तिचा पती सिडको ग्रामीण पोलीस ठाण्यात असता, पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याची माहिती पीडित महिलेनं पत्रकार परिषदेत दिली आहे.

 

पत्रकार परिषद घेतल्यानंतर पोलिसांनी कायदेशीर कारवाईचं पाऊल उचललं

दरम्यान, पोलीस एकूण घेत नसल्याने महिलेने पत्रकार परिषद घेतल्यानंतर पोलिसांनी कायदेशीर कारवाईचं पाऊल उचललं आहे. यानंतर सिडको ग्रामीण पोलिसांनी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष माधव देवसरकर याच्या विरोधात कलम ५०९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी