औरंगाबादमध्ये मनसेच्या सभेचे झळकले होर्डिंग, ऐतिहासिक 'राज' सभेचे साक्षीदार व्हा असं करण्यात आलय आवाहन

Flashing hoardings of MNS meeting in Aurangabad : राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी मराठवाडा सांस्कृतिक मैदानाऐवजी सिडको परिसरात असलेल्या गरवारे स्टेडियममध्ये सभेसाठी परवानगी देण्याची तयारी पोलिसांनी दर्शवली आहे. मनसेच्या या सभेला गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनुचित प्रकार घडला तर लोकांना त्रास होईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

Flashing hoardings of MNS meeting in Aurangabad
औरंगाबादमध्ये मनसेच्या सभेचे झळकले होर्डिंग  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • औरंगाबादेत मनसेच्या सभेचे होर्डिंग झळकू लागले
  • मनसेने लावलेल्या होर्डिंगवर ऐतिहासिक राज सभेचे साक्षीदार व्हा असे आवाहन करण्यात आले
  • गरवारे स्टेडियममध्ये सभेसाठी परवानगी देण्याची तयारी पोलिसांनी दर्शवली

औरंगाबाद  : १ मे रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या मनसेच्या सभेला अद्याप परवानगी मिळालेली नसताना देखील राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणारच असा पवित्रा मनसेने घेतला आहे. कारण, औरंगाबादेत मनसेच्या सभेचे होर्डिंग झळकू लागले आहेत. १ मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबादेत होणाऱ्या सभेला अनेक संघटनांनी पोलिसांना निवेदन देत ठाकरे यांच्या सभेला परवानगी देऊ नये असं म्हटलं होत. दरम्यान, पोलिसांकडून देखील अद्याप परवानगी देण्यात आली नसली तरी राज ठाकरे यांच्या सभेचे होर्डिंग औरंगाबादेत झळकू लागल्याने कुठल्याही परस्थितीत मनसे सभा घेणारचं असं दिसतय. त्याचबरोबर मनसेने लावलेल्या होर्डिंगवर ऐतिहासिक राज सभेचे साक्षीदार व्हा असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक वाचा ; या शेतकऱ्यांना नाही मिळणार PM किसान योजनेचा ११ वा हप्ता

गरवारे स्टेडियममध्ये सभेसाठी परवानगी देण्याची तयारी पोलिसांनी दर्शवली

राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी मराठवाडा सांस्कृतिक मैदानाऐवजी सिडको परिसरात असलेल्या गरवारे स्टेडियममध्ये सभेसाठी परवानगी देण्याची तयारी पोलिसांनी दर्शवली आहे. मनसेच्या या सभेला गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनुचित प्रकार घडला तर लोकांना त्रास होईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे. कारण मनसेने निश्चित केलेल्या सभेच्या ठिकाणी म्हणजेच मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर प्रवेशासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एकच दरवाजा आहे.

अधिक वाचा ; देशातील खाद्यतेल महागणार...इंडोनेशियाची पामतेल निर्यातबंदी

अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी दिला इशारा

मनसेच्या या सभेला पोलिसांकडून अद्याप पर्यंत परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे, मनसे आता आक्रमक होताना दिसत आहे. सभेला अवघे ८ दिवस उरले असताना देखील पोलिसांनी परवानगी न दिल्याने लवकर योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ असा इशारा मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी दिला आहे. दरम्यान, सभेच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. मनसेच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेला अनेक संघटनांनी विरोध करत पोलिसांना निवेदन देत परवानगी नाकारावी असं म्हटलं आहे.

अधिक वाचा : टीसीएसच्या नव्या नोकरभरतीत पदवीधरांना संधी, जाणून घ्या तपशील 

या संघटनांनी राज ठाकरेंच्या सभेला केला विरोध?

  1. वंचित बहुजन आघाडी
  2. गब्बर ॲक्शन संघटना
  3. मौलांना आझाद  विचार मंच 
  4. प्रहार संघटना
  5. ऑल इंडिया पँथर सेना
  6. या संघटनांनी राज ठाकरे यांच्या सभेला विरोध केला आहे 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी