दोन महिन्यांपासून तडीपार असलेल्या एमआयएमएमच्या माजी नगरसेवकाच्या पोलिसांनी सिनेस्टाईल आवळल्या मुसक्या

Former councilor was arrested by the police : माजी नगरसेवक शेख जफर शेख बिल्डर शेख अख्तर याच्यावरती गंभीर स्वरूपाचे १२ गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती माहिती पोलिसांनी (police) दिली आहे. (aurangabad police) शेख जफर शेख बिल्डरने पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुमाकूळ घातला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरुन जिन्सी पोलिसांनी तात्काळ आपला सापळा रचला आणि जफर बिल्डर यास अटक देखील केली आहे.

Former councilor was arrested by the police
माजी नगरसेवकाच्या पोलिसांनी सिनेस्टाईल आवळल्या मुसक्या   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • माजी नगरसेवक शेख जफरला पोलिसांनी केली अटक
  • पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुमाकूळ घातल्यामुळे जिन्सी पोलिसांनी केली अटक
  • मे २०२२ पासून जफर शेखला करण्यात आलं आहे तडीपार

औरंगाबाद : माजी नगरसेवक शेख जफर शेख बिल्डर शेख अख्तर याच्यावर अनेक गंभीर गुन्हे असल्याची माहिती आहे. गेली दोन महिन्यांपूर्वी शेख जफर शेख बिल्डर शेख अख्तर यास औरंगाबाद शहरातून (aurangabad city) तडीपार करण्यात आले आहे. शेख जफर शेख बिल्डर शेख अख्तर याच्या विरोधात १२ पेक्षा अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.  दरम्यान, औरंगाबाद शहरातून तडीपार केलेला रेकॉर्डवरील आरोपी माजी नगरसेवक शेख जफर शेख बिल्डर शेख अख्तर यास अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या (Arrest) आहेत.

अधिक वाचा : गोल्डन बॉयची कमाल, नीरज चोप्रा पहिल्याच प्रयत्नात फायनलमध्ये

पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुमाकूळ घातल्यामुळे जिन्सी पोलिसांनी केली अटक

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक शेख जफर शेख बिल्डर शेख अख्तर याच्यावरती गंभीर स्वरूपाचे १२ गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती माहिती पोलिसांनी (police) दिली आहे. (aurangabad police) शेख जफर शेख बिल्डरने पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुमाकूळ घातला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरुन जिन्सी पोलिसांनी तात्काळ आपला सापळा रचला आणि जफर बिल्डर यास अटक देखील केली आहे. दरम्यान, पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेख जफर यास तडीपार करण्याची शिफारस पोलिसांनी पोलीस उपायुक्तांकडे केली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्तांनी त्यास मे २०२२ मध्ये एक वर्षासाठी तडीपार केले होते.

अधिक वाचा : IND vs WI: विंडीज दौऱ्यापूर्वी टीम इंडियाच्या अडचणीत वाढ 

शहरातील सेव्हन हिल उड्डाणपुलाच्या परिसरात शेख जफर बिल्डरला करण्यात आली अटक

पोलिसांनी अनेक वेळा जफर बिल्डरला पकडण्याचा प्रयत्न केला असल्याची देखील माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे. कारण, पोलीस उपायुक्तांनी त्यास मे २०२२ मध्ये एक वर्षासाठी तडीपार केले असताना देखील आयुक्तांनी तडीपार करण्याच्या आदेशाचे जफरने या आदेशाचे उल्लंघन केले होते. केवळ दोनच महिन्यांत जफर बिल्डर परत आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती. यावरून अनेकदा पोलिसांनी जफरला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो पोलिसांना गुंगारा देऊन पळून जायचा. मात्र, यावेळी पोलिसांनी सापळा रचून शहरातील सेव्हन हिल उड्डाणपुलाच्या (Seven Hill Bridge) परिसरात त्याला अटक केली. असून, जिन्सी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी