औरंगाबादचे नामांतर न होणे हे फडणवीसांचे अपयश, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची टीका

shivsena Former Shivsena MP Chandrakant Khaire on devendra fadanvis : १९८८  पासून औरंगाबादला आम्ही संभाजीनगर म्हणत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रिकामे बसले नाहीत. केंद्रांत आणि राज्यात भाजपाची सत्ता असून संभाजीनगर केले नाही, हा भाजपचा दोष आहे, असा आरोपही शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

shivsena Former Shivsena MP Chandrakant Khaire on devendra fadanvis
'औरंगाबादचं नामांतर झालं नाही हा दोष फडणवीसांचा'  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • देवेंद्र फडणवीस हे जनतेची दिशाभूल करत आहेत - चंद्रकांत खैरे
  • १९८८  पासून औरंगाबादला आम्ही संभाजीनगर म्हणत आहोत - खैरे
  • संभाजीनगरचा मुद्दा घेऊन मी त्यांना वारंवार भेटलो

औरंगाबाद : देवेंद्र फडणवीस ( devendra Fadanvis ) हे जनतेची दिशाभूल करत असून, ते पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री असताना औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर व्हावे (Sambhajinagar) हा  मुद्दा घेऊन त्यांना वारंवार भेटलो, मात्र, त्यांनी औरंगाबादचे संभाजीनगर असं नामकरण केलं नसून, मुळात तेच जनतेची दिशाभूल करत आहेत, असा गंभीर आरोप शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे (Former Shivsena MP Chandrakant Khaire) यांनी केला आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांना औरंगाबादसाठी काहीही केलं नाही असंही खैरे यांनी म्हटलं आहे.  

अधिक वाचा : जैसवालच्या मॉन्स्टर सिक्सने हरवला बॉल, अंपायरने केले हे काम

१९८८ पासून औरंगाबादला आम्ही संभाजीनगर म्हणत आहोत

दरम्यान, पुढे बोलताना खैरे म्हणाले की, १९८८  पासून औरंगाबादला आम्ही संभाजीनगर म्हणत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रिकामे बसले नाहीत. केंद्रांत आणि राज्यात भाजपाची सत्ता असून संभाजीनगर केले नाही, हा भाजपचा दोष आहे, असा आरोपही शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. तर मी सगळीकडे संभाजीनगर बोलतो. २ वर्ष कायदेशीर तयारी केली आहे. आम्ही दोन अडीच वर्ष काम करत आहोत. असंही खैरे यांनी म्हटलं आहे. फडणवीस हे स्वतः पाच वर्षे मुख्यमंत्री होते. संभाजीनगरचा मुद्दा घेऊन मी त्यांना वारंवार भेटलो, त्यांनी का नाही हे नामकरण केले? मुळात फडणवीस हे जनतेची दिशाभूल करतात. त्यांनी संभाजीनगरसाठी काहीही केलेले नाही, असही खैरे म्हणाले.

अधिक वाचा ; विमान, ट्रेन, बस किंवा कारमधील सर्वात सुरक्षित सीट कोणत्या? 

अहो तुमचे नेतेच बहिरे झाले आहेत त्यांना पहा – चंद्रकांत खैरे

नामकरणाचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला असून, त्याचा पाठपुरावा देखील केला. पण केंद्राने तेही केले नाही. केवळ टाळ्या मिळवण्यासाठी अशी वक्तव्य करू नये. मला बहिरे म्हणतात. अहो तुमचे नेतेच बहिरे झाले आहेत त्यांना पहा, असे म्हणत फडणवीस खोटे बोलत आहे, असेही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा : लोकायुक्त कायदा करा नाही तर सत्तेतून पायउतार व्हा : अण्णा हज

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी