औरंगाबादेत घडलेल्या बहीण भावाच्या हत्येच्या घटनास्थळी आढळले चार चहाचे कप

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Jun 10, 2020 | 15:26 IST

घरात त्यांची मोठी मुलगी किरण लालचंद राजपुत (१९) आणि तिचा भाऊ सौरभ राजपुत (१७) हे दोघे घरात होते.याचा फायदा घेत आरोपीने दुपारच्या दरम्यान हे कृत्य केले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Four cups of tea were found at the scene of the murder of a sister and brother in Aurangabad
औरंगाबादेत घडलेल्या बहीण भावाच्या हत्येच्या घटनस्थळी,आढळले चार चहाचे कप  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • घटनास्थळी आढळले चार चहाचे कप 
  • बाथरूमध्ये आढळले दोघांचे मृतदेह
  • दुपारच्या दरम्यान हत्या झाल्याचा संशय

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये घडलेल्या बहीण भावच्या हत्येने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. राहत्या घरात बहिण-भावाची निघृर्णपणे  हत्या करण्यात आली असून ही  घटना ९ जून रोजी रात्रीच्या दरम्यान शहारालगतच सातारा परिसरातील एमआयटीजवळ घडली आहे. बहिण-भावाच्या हत्येने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या दोघा बहीण भावाचे मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत बाथरुममध्ये आढळले आहेत.

दुपारच्या दरम्यान हत्या झाल्याचा संशय

औरंगाबाद शहरा लगतच सातारा परिसरातील एमआयटी जवळील अल्फाईन हॉस्पिटलजवळ हे कुटुंब राहत होते.  शेतीच्या कामानिमित्त परिवारासह जालना येथे लालचंद राजपूत हे गेले होते. दरम्यान घरात मोठी मुलगी किरण राजपूत (१९) आणि तिचा भाऊ सौरभ राजपूत (१७) हे दोघेच घरात होते. याचाच फायदा घेत आरोपीने दुपारच्या दरम्यान हे कृत्य केले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

बाथरूमध्ये आढळले दोघांचे मृतदेह

रात्रीच्या दरम्यान किरण आणि सौरभचे वडील लालचंद राजपूत हे घरी परतले तेव्हा त्यांनी गाडीचा हॉर्न वाजवला. हॉर्न वाजवून देखील  घरातून कोणीच प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी घरात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांना बाथरूममध्ये दोघा मुलीचा आणि मुलाचा मृतदहे आढळला. दोघांचे गळे चिरून हत्या करण्यात आली होती. आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच उपायुक्त डॉ. राहुल खाडे, पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. दोघा बहिण-भावाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला असून. हत्येचे नेमके कारण अद्याप  कळू शकले नाही.

 

घटनास्थळी आढळले चार चहाचे कप 

मिळालेल्या माहितीनुसार, बहीण भावाची हत्या झालेल्या घटनास्थळावर चार चहाचे कप आढळले आले आहेत. यावरून हल्लेखोर हे ओळखीचे असावेत असा अंदाज लावला जात आहे. किरण आणि सौरभ या दोघांचे गळे चिरलेले आढळून आले. त्यामुळे मोठा रक्‍तस्राव झाल्याने दोघांचाही मृत्यू झालेला होता. दरम्यान, किरणचा गळा चिरण्यापूर्वी तिच्या डोक्यात जड वस्तूने जोरदार प्रहार केलेला असल्याचेही उघड झाले आहे.

पाळत ठेवून कृत्य केल्याचा अंदाज

दरम्यान, हे सर्व कृत्य चोरट्यांकडून पाळत ठेवून  करण्यात आला असावा, असा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. हत्या झालेल्या दोन्ही मुलांचे आई-वडील हे गावाला गेले आहेत.घरात फक्त दोघेच आहेत, याची चोरट्यांनी आधी पाहणी केली असावी. त्यानंतर संधी साधून चोरटे घरात घुसले असावेत. 

पुण्याला शिकायला होती किरण

पुण्याच्या शिवाजी नगर भागातील मॉडर्न महाविद्यालयात किरण शिक्षण घेत होती. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर, लॉकडाऊनमध्ये महाविद्यालय बंद असल्याने ती गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादेत आपल्या आई-वडिलांजवळ घरी आली होती. तर लहान भाऊ सौरभ हा पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकत होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी