Accident News उस्मानाबादमध्ये विचित्र अपघात, आयशरने दिली मागून दिली धडक आणि.......

Freak accident in Osmanabad, 2 died on the spot ; ट्रॅक्टरला धडक दिल्यानंतर आयशर चालाकांर आपली गाडीची वेग अधिक वाढवला. त्यांनतर शौचासाठी रस्त्याच्या कडेने जात असलेल्या नंदकुमार एकनाथ गुहेकर यांना सुद्धा चिरडले. यात नंदकुमार गुहेकर यांनाही जीव गमवावा लागला. आयशरचा चालक अपघातानंतर गाडी जागेवरच सोडून पळून गेला आहे.

Freak accident in Osmanabad, 2 died on the spot
उस्मानाबादमध्ये विचित्र अपघात, आयशरने दिली मागून दिली धडक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उस्मानाबाद शहरापासून काही अंतरावर असलेल्या येडशी या गावात एक विचित्र अपघात घडला आहे.
  • शौचासाठी रस्त्याच्या कडेने जात असलेल्या व्यक्तीलाही याचं आयशरने चिरडले
  • ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुरेश साबळे हे अपघात स्थळी दाखल

उस्मानाबाद : गेल्या काही दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यात अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आजही शहरापासून 12 ते 15 किलोमीटर असणाऱ्या येडशी या गावात एक विचित्र अपघात घडला. येथील येडशी येथील लक्की हॉटेलसमोर ही दुर्घटना घडली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.या अपघाताला जबाबदार असलेल्या आयशरचा चालक हा  गाडी सोडून पसार झाला आहे. 

MH 20 EL 7610 या क्रमांकाच्या आयशरने चोराखळी येथील साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पाठी मागून धडक दिली. त्यामुळे ट्रॅक्टरचा चालक ज्योतीराम मिसाळ हा रस्त्यावर पडला, त्यावेळी पाठीमागून धडक देणाऱ्या आयशरनेचं मिसाळ यांना चिरडले, यात ट्रॅक्टर चालक ज्योतीराम मिसाळ हे जागेवरच मृत्युमुखी पडले.स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघाताचा मोठा आवाज आला होता. हा आवाज ऐकून आम्ही घटनास्थळी धावलो परंतु आम्ही पोहूचेपर्यंत दोघांनी आपला प्राण सोडला होता. 

अधिक वाचा ; कमी वयातच दाढी झाली सफेद? जाणून घ्या या मागील चार कारणे

शौचासाठी रस्त्याच्या कडेने जात असलेल्या व्यक्तीलाही याचं आयशरने चिरडले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशर ट्रॅक्टरला धडकल्यानंतर चालकाने आपल्या गाडीचा वेग अधिक वाढवला. वाहनाचा वेग वाढल्यामुळे वाहन नियंत्रणाच्या बाहेर गेले आणि शौचासाठी एका व्यक्तीला धडक दिली. नंदकुमार एकनाथ गुहेकर असे एका  यांना सुद्धा चिरडले, यात नंदकुमार गुहेकर यांनाही जीव गमवावा लागला. अपघातानंतर आयशरचा चालक आपले वाहन जागेवरच सोडून पळून गेला आहे. हा अपघात एवढा विचित्र होता की ग्रामस्थ चक्रावून गेले होते. मोठा आवाज झाल्यानंतर येडशी येथील ग्रामस्थ मदतीसाठी अपघातस्थळी धावून गेले, मात्र तोपर्यंत दोघांनीही प्राण सोडले होते, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.  

अधिक वाचा ; जाणून घ्या कधी आमने-सामने येतील भारत आणि न्यूझीलंड संघ 

ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुरेश साबळे हे अपघात स्थळी दाखल

हा अपघात झाल्याची माहिती उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुरेश साबळे यांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले. उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे उस्मानाबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुरेश साबळे यांनी सांगितले आहे.

अधिक वाचा ; या राशीच्या लोकांनी कोणालाही देऊ नये उधार अन्यथा व्हाल कंगाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी