घोरपडीच्या गुप्तांगाची अंधश्रद्धेपोटी होत होती तस्करी, पहिल्यांदाचं झाली अशा प्रकारची कारवाई

Ghorpadi's private parts were being smuggled out of superstition : वन विभागाच्या पथकातील एका सदस्यांनी बनावट ग्राहक बनून  संपर्क साधला होता. यावेळी पथकातील लोकांना समोरच्या व्यक्तीकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. यावरून पथकातील सदस्यांनी सदर दुकानावर धाड टाकली. आरोपीने सुरुवातीला साडेतीन हजार रुपये प्रति दराने हात्था जोडी (घोरपडीचे गुप्तांग) विक्री करीत असल्याचे सांगितले असल्याची माहिती पथकातील सदस्यांनी दिली आहे

Ghorpadi's private parts were being smuggled out of superstition
घोरपडीच्या गुप्तांगाची अंधश्रद्धेपोटी होत होती तस्करी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वन विभाग कार्यालयाने मोगडपल्ली आयुर्वेदिक मेडिकलमध्ये धाड टाकत धाडशी कारवाई  केली आहे.
  • या कारवाईमध्ये  घोरपड वन्य प्राण्याचे गुप्तांग आणि समुद्रातील श्रेणी एक मधील वनस्पती ब्लॅक कोरलसह अन्य वन्य जीवांचे अवयव ताब्यात घेण्यात आले
  • अशा वनस्पतीच्या तस्करीवर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ

नांदेड : नांदेड शहरातील मोगडपल्ली आयुर्वेदिक मेडिकलमध्ये वन विभाग कार्यालयाने (Nanded Forest Department) धाड टाकत धाडशी कारवाई  केली आहे. या कारवाईत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्मिळ वन्यजीवांची तस्करी (Smuggling) करणारी टोळी गजाआड केली आहे. दरम्यान, या कारवाईमध्ये  घोरपड वन्य प्राण्याचे गुप्तांग आणि समुद्रातील श्रेणी एक मधील वनस्पती ब्लॅक कोरलसह अन्य वन्य जीवांचे अवयव ताब्यात घेण्यात आले आहे. देखील जप्त करण्यात आले आहे. मोगडपल्ली आयुर्वेदिक मेडिकलमध्ये हे शहरातील नामाकीत मेडिकल असल्याची माहिती आहे.

अधिक वाचा : प्रेषित पैंगबरांवर वादग्रस्त विधानाप्रकरणी भाजप आमदाराला अटक

अशा वनस्पतीच्या तस्करीवर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ

समोर आलेल्या माहितीनुसार, ब्लॅक कोरल ही समुद्रातील दुर्मिळ वनस्पती असून अन्न साखळीत महत्वाची भूमिका बजावते. अशा वनस्पतीच्या तस्करीवर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेली एवढी मोठी कारवाई गेल्या वीस वर्षात झाली नसल्याची माहिती वनविभाग कार्यालय नांदेडने दिली आहे. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या या वनस्पती आणि अवयवांचा वापर ग्रामीण भागात उच्चभ्रू लोक अंधश्रद्धेपोटी धनसमृद्धीसाठी  करतात अशी माहिती देखील मिळाली आहे. दरम्यान, अंधश्रद्धेपोटी मोठ्या प्रमाणात घोरपड प्राणी मारून हे अवयव विकले जातात अशी देखील माहिती समोर आली आहे. नांदेड येथील वन विभाग आणि वन्यजीव अपराध नियंत्रण (WCCB) आणि TRAFFIC INDIA यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कारवाई करण्यात आली आहे.

अधिक वाचा : कृष्णा अभिषेकने 'का' सोडला The Kapil Sharma Show?

ब्लॅक कोरलसहित आरोपी स्वप्नील बाबुराव सूर्यवंशीला घेण्यात आले ताब्यात

वन विभागाच्या पथकातील एका सदस्यांनी बनावट ग्राहक बनून  संपर्क साधला होता. यावेळी पथकातील लोकांना समोरच्या व्यक्तीकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. यावरून पथकातील सदस्यांनी सदर दुकानावर धाड टाकली. आरोपीने सुरुवातीला साडेतीन हजार रुपये प्रति दराने हात्था जोडी (घोरपडीचे गुप्तांग) विक्री करीत असल्याचे सांगितले असल्याची माहिती पथकातील सदस्यांनी दिली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली असता त्यानी घोरपड गुप्तांग, ब्लॅक कोरलसहित आरोपी स्वप्नील बाबुराव सूर्यवंशी याला ताब्यात घेतले आहे. तर आणखी दोन आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी विरोधात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९ कलम ४९ कलम ४९ (ब) व कलम ५२ नुसार वन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अधिक वाचा ; झिम्बाब्वे विजयानंतर भारतीय खेळाडूंनी केला जबरदस्त डान्स 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी