Tiranga Yatra: बीडमध्ये भाजपच्या तिरंगा यात्रेत उर्दू शाळेच्या विद्यार्थीनींचा सहभाग, VIDEO

Tiranga Yatra in Beed Maharashtra: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत मुस्लिम विद्यार्थीनींनी सुद्धा सहभाग घेतला. 

Girl students participate in BJP tiranga yatra wearing hijab in beed maharashtra watch video
Tiranga Yatra: हिजाब, बुरखा घालून आलेल्या विद्यार्थीनींचा भाजपच्या तिरंगा यात्रेत सहभाग, बीडमधील VIDEO VIRAL 
थोडं पण कामाचं
  • भाजपने आयोजित केलेल्या तिरंगा यात्रेत मुस्लिम मुलींचाही उत्स्फूर्त प्रतिसाद 
  • बीडमध्ये निघाली ३०० फूट लांब झेंड्याची तिरंगा यात्रा
  • खासदार प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये आयोजित केली तिरंगा यात्रा

Beed Tiranga Yatra: देश आपल्या स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण करत आहे. या निमित्ताने सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. संपूर्ण देशभरात घरोघरी तिरंगा अभियान राबवले जात आहे. यासोबतच ठिकठिकाणी तिरंगा यात्रा (Tiranga Yatra) सुद्धा काढण्यात येत आहेत. अशाच प्रकारची तिरंगा यात्रा बीड (Beed)मध्ये काढण्यात आली. 

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत सुरू असलेला घर घर तिरंगा अभियान दिल्ली ते गल्ली पर्यंत साजरा करण्यात येत आहे. बीडमध्ये  ३०० फूट लांब झेंड्याची तिरंगा यात्रा काढण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या खासदार प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये 300 फुट लांब तिरंगा झेंड्यासह तिरंगा यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेत शहरातील उर्दू विद्यालयासह सर्वच विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीनीं आपला सहभाग नोंदवला होता.

अधिक वाचा : गृहमंत्रालयाने स्वातंत्र्य दिनानिमित्त जारी केल्या सूचना; १५ ऑगस्ट रोजी असा फडकावा तिरंगा

विशेष म्हणजे या यात्रेत उर्दू विद्यालयातील विद्यार्थिनीनीं बुरखा परिधान करून त्या यात्रेत सहभागी झाल्या होत्या. अंगावर काळा बुरखा तर हातात तिरंगा घेऊन यात्रेत सहभागी झालेल्या या विद्यार्थिनी यात्रेचे आकर्षण ठरले. बीडमध्ये निघालेल्या या तिरंगा यात्रेची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.

अधिक वाचा : Independence Day 2022 WhatsApp Stickers: स्वातंत्र्य दिनाचे व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स आणि GIF फाईल असे पाठवा

भारतीय जनता पार्टी ही एका विचारांनी चालणारी पार्टी आहे असे आरोप होत असतांना आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने काढण्यात आलेल्या या यात्रेत मुस्लीम समुदायातील उर्दू विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीनीं आपला सहभाग नोंदवत देशाप्रती असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात तिरंगा फडकताना दिसत आहे. बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या तिरंगा यात्रेत एका प्रकारे छोट्या भारताचं दर्शन घडलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी