अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवस्थानला धमकीच्या पत्राने बीड जिल्ह्यात पुन्हा खळबळ, '५० लाख रुपये द्या अन्यथा RDX नं मंदिर उडवून टाकू'

give fifty lakh rupees otherwise rdx will blow up the temple threatening : परळीच्या (Parli) वैद्यनाथ मंदिरानंतर अंबाजोगाईच्या (Ambajogai) योगेश्वरी (Yogeshwari temple) मंदिराला RDX ने उडवण्याचं धमकीचं पत्र ( threaten letter) मिळालं

give fifty lakh rupees otherwise rdx will blow up the temple threatening
'५० लाख रुपये द्या अन्यथा RDX नं मंदिर उडवून टाकू'  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अंबेजोगाई येथील योगेश्वरी देवी मंदिर संस्थांच्या नावाने मिळाले पत्र
  • पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी योगेश्वरी मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवू.
  • तक्रारीनंतर पोलिसांनी मंदिराला भेट देऊन संपूर्ण मंदिराची पाहणी केली.

बीड : दोन दिवसांपूर्वीच बारा ज्योतिर्लिंगापैकी परळी - वैद्यनाथ देवस्थानला धमकीचं पत्र मिळाल्याने मोठी खळबळ उडाली होती.  ५० लाख रुपये द्या अन्यथा आरडीएक्सने उडवून टाकू अश्या धमकीचे हे  देण्यात आली होते. परळीच्या (Parli) वैद्यनाथ मंदिरानंतर अंबाजोगाईच्या (Ambajogai) योगेश्वरी (Yogeshwari temple) मंदिराला RDX ने उडवण्याचं धमकीचं पत्र ( threaten letter) मिळालं असून, या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अंबेजोगाई येथील योगेश्वरी देवी मंदिर संस्थांच्या नावाने मिळाले पत्र

दरम्यान, बीड जिल्ह्यातील देवस्थानांना धमकीचे पत्र सतत मिळत असल्याने पोलिसांना देखील हे डोकेदुखीचे काम ठरत आहे. धमकी देणारा कोण त्याच्या पोलिसांनी लवकरात लवकर मुसक्या आवळण्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. आता बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान अंबेजोगाई येथील योगेश्वरी देवी मंदिर संस्थांच्या नावाने देखील अशाच पद्धतीचे धमकीचे पत्र मिळालं आहे.  

पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी योगेश्वरी मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवू.

आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया आहे. मला खाजगी व महत्वाच्या कामासाठी ५० लाख रुपयांची गरज आहे. हे पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी योगेश्वरी मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवू. असं धमकी देणार पत्र मिळालं आहे. दरम्यान, अशी धमकी असलेलं पत्र अंबाजोगाईच्या देवल कमेटीमध्ये शनिवारी रात्री मिळालं. 

तक्रारीनंतर पोलिसांनी मंदिराला भेट देऊन संपूर्ण मंदिराची पाहणी केली.

परळीच्या वैद्यनाथ मंदिरापाठोपाठ अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिरास ही असे धमकीचे पत्र प्राप्त झाल्यानं पोलिसांना आता या प्रकरणाचा कसून तपास करावा लागणार आहे. अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिराला हे पत्र मिळताच देवल कमिटी चे सचिव अँड.शरद लोमटे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी मंदिराला भेट देऊन संपूर्ण मंदिराची पाहणी केली. तसंच सुरक्षितता राखण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी