Crime News :औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात समोर एक धक्कादायक घटना घडली आहे. चार गुंडांनी मिळून एका पोलीसाला आणि तीन तरुणींना बेदम मारहाण केली आहे. सदर घटनेमुळे औरंगाबाद जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर, औरंगाबादसह राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.
अधिक वाचा : यावर्षीचा मुंबईतला पहिला गोविंदाचा मृत्यू, दोन दिवसांची झुंज
मिळालेल्या माहितीनुसार, चार गुंड हे तीन तरुणींना मारहाण करत त्यांची छेड देखील काढत होते. ही सर्व घटना घडत असताना त्याठिकाणी एक पोलीस आला आणि त्याने त्या गुंडांना विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र, एकटा पोलीसवाला पाहून चार गुंडांनी पोलिसाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात करत त्यांच्या डोक्यात दगड देखील घातला आहे. डोक्यात दगड मारल्याने पोलीस गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. हा सर्व थरारक प्रकार हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात समोर घडला आहे. सचिन सुधाकर म्हस्के (रा. पेठेनगर, औरंगाबाद) असे जखमी पोलीसाचे नाव आहे.
अधिक वाचा ; झोपेतून उठवून पत्नीला फेकले ट्रेनसमोर, घटनेचा Live Video
पोलीस कर्मचारी सचिन म्हस्के हे आपल्या ड्युटीवर जाण्यासाठी निघाले होते. यावेळी गोगाबाबा टेकडी परिसरात असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाजवळ तीन ते चार अज्ञात तरुणांनी तीन तरुणींचा पाठलाग करत त्यांची छेड काढत असल्याची घटना सुरु होती. आपल्या समोर पोलीस असल्याचं पाहताच तरुणींनी लगेच सचिन म्हस्के यांना आवाज दिला. तरुणींचा आवाज ऐकताच म्हस्के हे घटनास्थळी गेले. यावेळी तरुणींनी संगीतले की, चार मुले आमची छेड काढून आम्हाला मारहाण करत आहेत. त्या तरुणांनी आमच्या जवळील दुचाकी देखील हिसकावून घेतली आहे. असंही त्या तरूणींनी म्हस्के यांना सांगितले.
अधिक वाचा : 'या' भन्नाट अवतारात पाणी पुरी खायला गेली पूनम पांडे
दरम्यान, मुलीनी सांगितलेला प्रकार एकूण म्हसके यांनी तत्काळ तरुणींना ११२ क्रमांकावर कॉल करण्यास सांगितले. यावेळी आरोपी तिथे आले आणि तू मुलींना वाचविण्याचा प्रयत्न करतो का? असं म्हणत सर्व आरोपींनी पोलीस कर्मचारी म्हस्के यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आणि त्यांच्या डोक्यात दगड घातला. यात ते जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विद्यापीठ परिसरातील एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत.