'या' ग्रामपंचायतीचा कारभार पाहणार फक्त महिला, ७० वर्षात भाजपचीही एकहाती सत्ता

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Feb 16, 2021 | 20:07 IST

Gram Panchayat is in the hands of women: सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण पुरुषाला सोडण्यात आले होत्र. मात्र, पुरुषाला आरक्षण पडलेले असताना देखील गावाने महीला सबलीकरणाचा विचार सत्यात उतरवला आहे.

Gram Panchayat is in the hands of women
'या' ग्रामपंचायतीचा काराभार पाहणार फक्त महिला  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या पाच महिला आता गावाचा कारभार चालवणार, चिंचपूरने आदर्श निर्माण केला
  • विजयी महिलांचे गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आलं स्वागत  
  • भारतीय जनता पार्टीने ही सत्ता ७ – ४  च्या फरकाने खेचून आणली

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील (osmanabad district) एका गावातील ग्रामपंचायतीने (gramapanchyat election) एक नवा आदर्श घालून दिला आहे. परांडा तालुक्यातील (paranda taluka) चिंचपूर (बु) या ग्रामपंचायतीच्या (chinchapur bu gramapanchayat) सत्तेच्या चाव्या आता सावित्रीच्या लेकीच्या हाती आल्या आहेत. ७० वर्षाच्या इतिहासात प्रथमच या ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीची (bjp) एकहाती सत्ता आली असून, त्यात नवल म्हणजे सदर ग्रामपंचायतीचा कारभार आता महिला पाहणार असल्याने भ्रष्टाचाराला देखील आळा बसणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे. भारतीय जनता पार्टीने ही सत्ता ७ – ४  च्या फरकाने खेचून आणली आणि ती महिल्यांच्या हाती सुपूर्द केल्यामुळे सर्व गावात आनंदाचे वातावरण आहे.

राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या पाच महिला आता गावाचा कारभार चालवणार, चिंचपूरने आदर्श निर्माण केला

परंडा पंचायत समिती सदस्या अश्विनी सतिश देवकर या भारतीय जनता पार्टीच्या जनशक्ती परिवर्तन पॅनलच्या प्रमुख आहेत. यांनी ग्रामपंचायतच्या सत्तेच्या चाव्या सावित्रीच्या लेकीच्या हाती देऊन नारी शक्तीचा मोठा सन्मान केला आहे. चिंचपूर ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण पुरुषाला सोडण्यात आले होत्र. मात्र, पुरुषाला आरक्षण पडलेले असताना देखील गावाने महीला सबलीकरणाचा विचार सत्यात उतरवला आहे. सर्व सामन्य कुटुंबातील कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या पाच महिला आता गावाचा कारभार चालवणार आहेत. एकीकडे सत्तासंघर्षाची रस्सीखेच सुरु असताना चिंचपूर हे गाव आदर्श निर्माण करुन देत असल्याचे समोर आले आहे.

या महिला सांभाळणार गाव कारभार

चिंचपूर गावच्या सरपंचपदी प्रियंका पोपट शिंदे यांची निवड करण्यात आली आहे  तर उपसरपंचपदी द्वारकाबाई गोवर्धन सावंत यांची निवड करण्यात आली. तर भाग्यश्री भारत देवकर, शितल दत्तात्रय सुतार, महेश भागवत देवकर,  विद्या प्रकाश सावंत, भगवत कोंडीबा शिंदे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

 

विजयी महिलांचे गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आलं स्वागत  

आमदार राणाजगजीतसिंह पाटील आणि आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा तालुका अध्यक्ष राजकुमार पाटील, भाजयुमो तालुका अध्यक्ष अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही सत्ता भारतीय जनता पार्टीने ७ – ४ च्या फरकाने खेचून आणली आहे. दरम्यान, कायद्याने महिलांना ५०% आरक्षण दिले आहे. मात्र,  आज चिंचपूर (बु)  सारख्या ग्रामपंचायतीत १००% महिलाराज पाहायला मिळाल असल्याचे त्यांचे कौतुक केले जात आहे. भाजपचे सर्वसाधारण पुरुष जागेवर निवडुन आलेले महेश देवकर आणि भागवत शिंदे यांनी पदाची अपेक्षा न करता महिलांच्या हाती सत्ता देऊन आदर्श निर्माण केला आहे. फुलांच्या पायघड्या घालून विजयी महिलांचे गावकऱ्यांनी स्वागत केलं. महिला सरपंच आणि उपसरपंच यांचा सत्कार केला. सरपंच निवडीनंतर यानंतर ग्रामस्थांच्या वतीने उमेदवारांचा नागरी सत्कार करण्यात आला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी