एसटीच्या प्रवाश्यांना मोठा दिलासा, या जिल्ह्याच्या आगारातून धावल्या १०१ बसगाड्या

Great relief to the passengers : संप पूर्णपणे मिटला नसला तरी, एस टी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातील म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील ८ आगारांपैकी ७ आगारांमधून, १०१ बसगाड्या धावल्या

Great relief to the passengers
'या' जिल्ह्याच्या आगारातून धावल्या १०१ बसगाड्या , मोठा दिलास  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • औरंगाबाद जिल्ह्यातील ८ आगारांपैकी ७ आगारांमधून, १०१ बसगाड्या धावल्या
  • केवळ सिल्लोड आगारातून एकही बस धावली नाही
  • मानसिक स्थिती ठीक नसल्याने कामावर जाण्याची मानसिकता नाही – एस टी कर्मचारी

औरंगाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून एस टी महामंडळाचे कर्मचारी आपल्या विविध मागण्यासाठी संप करत आहेत. पगारवाढ आणि विलीनिकरनाची मागणी घेवून कर्मचारी संप करत असल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान, एस टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक प्रवाश्यांना याचा मोठा फटका बसला असून, संपतील अनेक कर्मचारी हे पुन्हा कामात रुजू झाले आहेत. मात्र, अद्याप संप पूर्णपणे मिटला नसला तरी, एस टी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातील म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील ८ आगारांपैकी ७ आगारांमधून, १०१ बसगाड्या धावल्या आहेत. त्यामुळे, प्रवाश्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.

केवळ सिल्लोड आगारातून एकही बस धावली नाही

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील ८ आगारांपैकी ७ आगारांमधून, १०१ बसगाड्या धावल्या असल्या तरी सिल्लोड आगारातून एकही बस धावली नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, कामावर हजार झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत एस टी कर्मचाऱ्यांनी संप अद्याप पूर्णपणे मागे घेतला नाही.

मानसिक स्थिती ठीक नसल्याने कामावर जाण्याची मानसिकता नाही – एस टी कर्मचारी

एसटी कर्मचारी संघटनेने संप मागे घेतलं. परंतु त्या संघटनेशी काहीही संबंध नाही, मात्र, आम्ही संपात नाही, तर दुखवट्यात आहोत. कारण विलीनीकरणाच्या मागणीसाठी एक दोन नव्हे तर तब्बल ५४ जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली असून, त्यामुळे आमची मानसिक स्थिती ठीक नसल्याने कामावर जाण्याची मानसिकता नसल्याचे निवेदन एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहे. याची सुनावणी ५ जानेवारी रोजी होणार आहे. तोपर्यंत दुखवटा कायम ठेवणार असल्याचे कर्मचाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

ऑक्टोबर महिन्यातील आणि नोव्हेंबर मधील वेतनचिट्ठी पाहिली किमान नऊ हजार रुपयांची वाढ झाली

साडे सतरा टक्के करा पैकी सरकार एसटी महामंडळाला १० टक्के कर पुन्हा माघारी करत असतो. आणि दुसरी बाब डीजेझल वरील व्हॅट कमी होण्याबाबत तर ही केवळ अफवा आहे. त्याचबरोबर विलीनीकरण झालं तर १७.५० टक्के प्रवाशी कर, २७ टक्के व्हॅट कमी होईल अशी चर्चा आहे. मात्र, याचा फायदा कर्मचाऱ्यांना होणार नाही. असं शेखर चन्ने यांनी म्हटलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मुळं वेतनात वाढ झाल्यामुळं डीए, एचआरए आणि दरवर्षी मिळणारी वेतनवाढ या सर्व बाबींमध्ये वाढ होते. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातील आणि नोव्हेंबर मधील वेतनचिट्ठी पाहिली किमान नऊ हजार रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, आम्ही घसघशीत पगारवाढ दिली आहे. आम्ही मुळं पगारात पाच हजार रुपयांची वाढ केली आहे. असं शेखर चन्ने यांनी म्हटलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी