बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवाचा मृत्यू, 18 डिसेंबरला होते लग्न

groom died before the marriage in beed ; बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बोहल्यावर चढण्याआधीच एका स्थापत्य अभियंत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला

groom died before the marriage in beed
बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवाचा मृत्यू,18 डिसेंबरला होते लग्न  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अभियंता तरुणाचा विवापुर्वीचं मृत्यू
  • 18 डिसेंबरला होते अभियंता तरुणाचे लग्न
  • लग्नापूर्वीच मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा

बीड  : बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बोहल्यावर चढण्याआधीच एका स्थापत्य अभियंत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. धीरज तट असं या तरुण अभियंत्याचे नाव होते. धीरजचा विवाह देखील ठरला होता. मात्र, लग्नाच्या काही दिवसाआधीच धीरजचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली. 18 डिसेंबर रोजी धीरजचा  विवाह (Wedding) होणार होता, अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबियांकडून त्याच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु होती. मात्र अचानक त्याचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अधिक वाचा ; मी मारायला आणि मरायला पण घाबरत नाही स्टेटस ठेवून झाला मृत्यू

धीरजने अभियांत्रिकीचे शिक्षण आंबाजोगाईमध्येच पूर्ण केले होते

मिळालेल्या माहितीनुसार, धीरज हा खूप हुशार होता. अभियांत्रिकीचे शिक्षण आंबाजोगाईमध्येच पूर्ण केले आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो नोकरीसाठी पुण्याला गेला होता. धीरजचे कुटुंब हे अंबाजोगाई शहरातील बँक कॉलनी परिसरात आहे. धीरजला आई वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे. धीरज हा त्याच्या आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता.

अधिक वाचा ; बायका 'हे' काम करत असतील पुरुषांनी लगेच फिरवावेत आपले डोळे

धीरजला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला

धीरजच्या कुटुंबीयांनी 18 डिसेंबर रोजी लग्नाचा मुहूर्त काढला होता. आपल्या एकुलत्या एक मुलाचा लग्न सोहळा धूम धडाक्यात पार पडावा म्हणून धीरजच्या कुटुंबीयांनी जोरदार लग्नाची तयारी सुरु केली होती. मात्र, लग्न काही दिवसावर येऊन ठेपले असतानाचं हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला आणि धीरजचा दुर्दैवी मृत्यू झाला. धीरजचे लग्न तीन महिन्यापूर्वी लग्न जमलं होतं. मोठ्या धुमधडाक्यात साखरपुडाही झाला. या साखरपुड्याला कुटुंब आणि परिवारातील लोक मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते. धीरज तट याचे मूळ गाव हे अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव आहे. त्याच गावी त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. खरंतर लग्नासाठी येणाऱ्या नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी येण्याची वेळ आल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.

अधिक वाचा ; उद्धव ठाकरे कडाडले,कर्नाटकच्या CMचा ठाकरी शैलीत घेतला समाचार

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी