Crime News अवघ्या 21 दिवसांचा संसार उद्धवस्त, पोलिसांनी पत्नीला घेतलं ताब्यात

beed ; पांडुरंग हा खूप मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याचे परिसरातील सर्वांसोबतच चांगले संबंध होते. त्याचा 21 दिवसांपूर्वीच नुकताच विवाह झाला होता. त्याच्या विवाहाने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. त्याचा नवा संसार असतानाच काळाने त्याच्यावर घाला घातला आणि अवघ्या 21 दिवसांचा संसार उद्धवस्त  झाला आहे.

Groom's death after 21 days of marriage
21 दिवसांचा संसार उद्धवस्त, पोलिसांनी पत्नीला घेतलं ताब्यात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लग्नाच्या अवघ्या 21 दिवसानंतर नवरदेवाचा मृत्यू
  • पांडुरंग यांच्या मृत्यूला त्याची पत्नीलाच जबाबदार धरण्यात आलं
  • पोलिसांनी घेतलं पांडुरंगच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात

बीड  : लग्न झाल्यानंतर अवघ्या 21 दिवसानंतर नवरदेवाचा मृत्यू झाला असल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. बीडमधील गेवराईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पांडुरंग चव्हाण असं मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे. दरम्यान, तरुणाच्या कुटुंबीयांनी मुलाच्या मृत्यूनंतर थेट त्याच्या पत्नीवर संशय व्यक्त केला आहे. त्याचबरोबर तरुणाच्या पत्नीवर गुन्हा देखील दाखल करावा अशी मागणी तरुणाच्या कुटुंबातील सदस्यांनी केली होती. नातेवाईकांनी गेवराई पोलिस ठाण्यामध्ये गर्दी देखील केली होती. (Groom's death after 21 days of marriage in beed )

अधिक वाचा ; ATM कार्ड विसरलात? स्मार्टफोनच्या मदतीने काढा एटीएममधून पैसे

पत्नीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा नातेवाईकांनी केली मागणी

दरम्यान, पांडुरंग चव्हाण या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी आता त्याच्या पत्नीला ताब्यात घेतलं असून, पांडुरंगचा अचानक मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियातील सदस्यांनी पांडूरंगच्या पत्नीवर संशय आला आहे. त्यामुळे, पांडुरंगचे नातेवाईकांनी त्याच्या पत्नीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून गेवराई पोलिस ठाण्यामध्ये गर्दी केली होती. गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील पांडुरंग रामभाऊ चव्हाण या 22 वर्षीय तरुणाचा काही दिवसापूर्वीच विवाह झाला होता. मात्र अचानक त्याचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबातील सदस्यांना मोठा धक्का बसला आहे.

अधिक वाचा ; संपत्तीच्या वादातून मुलाने वडील शौचास जाताच शौचालय पेटवले

पांडुरंगला अचानक रात्री आला हृदयविकाराचा झटका

पांडुरंग नावाच्या तरुणाचा 21 दिवसापूर्वी थाटामाटात विवाह झाला होता. रात्री अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, त्याला गेवराईच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दरम्यान, पांडुरंगचा शवविच्छेदनाचा अहवाल काही दिवसातचं समोर येईल त्यानंतर त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. मात्र, त्याअगोदर पांडुरंगच्या नातेवाईकांना आपल्या मुलाच्या मृत्यूला त्याची पत्नी कारणीभूत असल्याचा संशय वाटत असल्याने त्याच्या नातेवाईकांनी तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे  केली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला. तोपर्यंत त्याच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे.

अधिक वाचा ; दिनेश कार्तिक की ऋषभ पंत, सेमीफायनलमध्ये कोण खेळणाार 

अवघ्या 21 दिवसांचा संसार उद्धवस्त  झाला, परिसरात हळहळ

मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग हा खूप मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याचे परिसरातील सर्वांसोबतच चांगले संबंध होते. त्याचा 21 दिवसांपूर्वीच नुकताच विवाह झाला होता. त्याच्या विवाहाने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. त्याचा नवा संसार असतानाच काळाने त्याच्यावर घाला घातला आणि अवघ्या 21 दिवसांचा संसार उद्धवस्त  झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पांडुरंग यांच्या मृत्यूला त्याची पत्नीलाच जबाबदार धरण्यात आलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी