Guava Farming : लॉकडाऊनचा केला सदुपयोग, पेरूच्या शेतीतून मिळवला तब्बल २५ लाखापेक्षा जास्त नफा

farmer earned 25 lakh rupees in corona lockdown : ताला कायम स्वरूपी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी त्यानी आधुनिक पध्तीने १ एकर मधे शेततळे बांधले असून २ विहीरद्वारे मुबलक पाणी साठा केला आहे. वैद्य यांनी अत्यंत नियोजनबद्द शेती विकसित केली असून, तीन महिन्यापासून पेरू उत्पादन सुरू आहे

farmer earned 25 lakh rupees in corona lockdown
लॉकडाऊनचा केला सदुपयोग, पेरूच्या शेतीतून मिळवला तब्बल २५ लाखापेक्षा जास्त नफा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अत्यंत योग्य नियोजन द्वारे १० हजार पेरू झाडाचे उत्तम संगोपन केले आहे
  • गेल्या तीन महिन्यापासून  पेरू उत्पादन सुरू असून  आतापर्यंत त्यानी १०० टन पेरूची विक्री
  •  उच्च पदावर असताना देखील वैद्य यांना शेतीचे ‘वेड’

Guava Farming : उस्मानाबाद : शेतीची जर नियोजनबद्धपणे केली तर अधिक नफा मिळू शकते. अशाच नियोजनबद्ध पद्धतीने शेती करून तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द गावातील सुशिक्षित शेतकरी अँड सोमेश वैद्य आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी पेरूच्या शेती करून मोठ्या प्रमाणात नफा कमावला आहे. कोरोनामध्ये घालून देण्यात आलेल्या लॉकडाऊनचा वैद्य कुटुंबीयांनी सदउपयोग करीत चक्क २५ लाख रुपये मिळवले आहेत. (guava farmer earned 25 lakh rupees  in corona lockdown)

१० हजार पेरू झाडाचे उत्तम संगोपन 

दरम्यान, अँड सोमेश वैद्य यांनी गेल्या जून २०२० मधे तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द या गावात ५ एकर आणि  उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डि गावात ५ एकर थाई ७ आणि पिंक सुपर वाण जातीचा  पेरू बाग व्यक्तिश  स्वतः लक्ष  घालून लागवड  केली होती. गेल्या १८ महिन्यात त्यानी पेरू बाग अत्यंत चांगली जोपासली असून ड्रिप सिंचन द्वारे खते व पाणी झाडास उपलब्ध करून अत्यंत योग्य नियोजन द्वारे १० हजार पेरू झाडाचे उत्तम संगोपन केले आहे.

आतापर्यंत १०० टन पेरूची विक्री

शेताला कायम स्वरूपी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी त्यानी आधुनिक पध्तीने १ एकर मधे शेततळे बांधले असून २ विहीरद्वारे मुबलक पाणी साठा केला आहे. वैद्य यांनी अत्यंत नियोजनबद्द शेती विकसित केली असून, तीन महिन्यापासून पेरू उत्पादन सुरू आहे. आतापर्यंत त्यानी १०० टन पेरू सोलापूर उस्मनाबाद  लातूर  बेळगाव, अहमदनगर येथील व्यापारी आणि बाजार समिति मधे विकून २५ लाख रुपयाचे उत्पादन मिळवले आहे. तसेच परिसरातील गरजू व्यक्ती आणि महिलांना नियमित रोजगार उपलब्ध करून दिला आहे. याबाबत श्री वैद्य यांचे परिसरातील शेतकरी कडून कौतुक केले जात आहे. 

 उच्च पदावर असताना देखील वैद्य यांना शेतीचे ‘वेड’

सोमेश वैद्य हे गेल्या १५  वर्षापासून मंत्रालय विधानभवन स्वीय सहायक पदावर कार्यरत असून ते सध्या  भोसरी चे आमदार महेशदादा लांडगे यांचे स्वीय सहायक म्हून विधानभवन मुंबई  येथे  काम पाहत आहेत. पेरू बाग शिवाय त्यानी त्यांच्या उर्वरित शेतात कोकणातील  जातिवंत  केशर आंबा दोन हजार झाडे आणि सिताफळ बाग लागवड केली असून त्याचे उत्पादन येत्या २ वर्षात मिळेल असे त्यानी सांगितले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी