माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंना मोठा धक्का`!`

Haribhau Bagde, the ex-speaker of the Legislative Assembly, got a big shock! : विविध कार्यकारी सहकारी संस्था सोसायटीच्या निवडणुकीत महाविकासआघाडीचा दणदणीत विजय झाला आहे. महाविकास आघाडीच्या शिवशक्ती शेतकरी पॅनलमधील १३ पैकी १२ उमेदवारांनी बाजी मारली. तर, भाजप नेते हरिभाऊ बागडे यांच्या पॅनलमधील एकाच उमेदवाराला विजय मिळाला आहे.

Haribhau Bagde, the ex-speaker of the Legislative Assembly, got a big shock!
माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंना मोठा धक्का !   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बागडे यांना विविध कार्यकारी सहकारी संस्था सोसायटी निवडणुकीत मोठा धक्का
  • महाविकास आघाडीच्या शिवशक्ती शेतकीर पॅनलचा दणदणीत विजय
  • आज आलेल्या निकालात त्यांच्यावर मोठी नामुष्की ओढवली गेली आहे

औरंगाबाद : भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना विविध कार्यकारी सहकारी संस्था सोसायटी निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. बागडे यांना मतदारसंघातील चित्तेपिंपळगाव येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था सोसायटीच्या निवडणुकीत हा धक्का बसला आहे. आज आलेल्या निकालात बागडे यांची असणारी ३० ते ३५ वर्षांची एकहाती सत्ता महाविकाआघाडीने उलथवली आहे. सदर निवडणुकीत मविआचे १३ पैकी १२ सदस्य निवडून आले आहेत. तर बागडे यांच्या पॅनलमधील एकच सदस्य निवडून आला आहे. पूर्वी एकहाती असलेली सत्ता आज बागडे यांच्या हातातून निसटल्याने बागडे यांना हा मोठा धक्का समजला जात आहे.

अधिक वाचा : रक्षाबंधनाचा पार्लर खर्च वाचवा, फॉलो करा 'या' घरगुती Tips

महाविकास आघाडीच्या शिवशक्ती शेतकीर पॅनलचा दणदणीत विजय

हरिभाऊ बागडे हे भाजपचे दिग्गज नेते आहेत. बागडे हे अनेक वर्षापासून सलग निवडून येतात. त्यामुळे त्यांची मतदारसंघावर आणि पक्षात मोठा वचक आहे. मात्र, आज आलेल्या निकालात त्यांच्यावर मोठी नामुष्की ओढवली गेली आहे. कारण, विविध कार्यकारी सहकारी संस्था सोसायटीच्या निवडणुकीत महाविकासआघाडीचा दणदणीत विजय झाला आहे. महाविकास आघाडीच्या शिवशक्ती शेतकरी पॅनलमधील १३ पैकी १२ उमेदवारांनी बाजी मारली. तर, भाजप नेते हरिभाऊ बागडे यांच्या पॅनलमधील एकाच उमेदवाराला विजय मिळाला आहे. काँग्रेस नेते आणि माजी आमदार रामभाऊ अप्पा गावंडे यांचे सुपुत्र सामराव गावंडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजी गावंडे यांच्या यांनी मिळून शिवशक्ती शेतकरी पॅनल उभा केला होता. दरम्यान, या पॅनलचा विजय झाल्याने हरिभाऊ बागडे यांची लोकप्रियता कमी तर होत चालली नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अधिक वाचा ; शाळेतला 'तो' किस्सा आठवून ढसाढसा रडला मिस्टर परफेक्शनिस्ट 

कशी आहे हरिभाऊ बागडे यांची कारकीर्द?

बागडे यांची भाजपात मोठी किंमत आहे. ते पहिल्यांदा औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून १९८५ साली विधानसभेवर निवडून गेले होते. यानंतर त्यांनी फुलंब्री मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत २०१४ मध्ये देखील विजय मिळवला. त्याच मतदारसंघातून २०१९ ची विधानसभा निवडणूकही जिंकली. दरम्यान, २०१४ मध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आले होते. यावेळी फडणीस सरकारच्या काळात बागडे यांना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

अधिक वाचा ; Terror Funding Case: डोडा आणि जम्मूमध्ये एनआयएचे छापे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी