हर्षवर्धन जाधवांनी पुन्हा केला मोठा गौप्यस्फोट, खैरे, जलील दोघेही निशाण्यावर!

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Feb 25, 2021 | 19:05 IST

Harshvardhan Jadhav targets Chandrakant Khaire: जाधव यांनी पुन्हा एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. निवडणुकीला धार्मिक रंग देऊन राजकीय पोळी भाजण्याचा चंद्रकांत खैरे यांचा प्रयत्न होता.

Harshvardhan Jadhav targets  Chandrakant Khaire
हर्षवर्धन जाधवांनी पुन्हा केला मोठा गौप्यस्फोट  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • रावसाहेब दानवे यांचा हा दबाव मोडून काढा आणि मला सरंक्षण द्यावं - हर्षवर्धन जाधव
  • निवडणुकीला धार्मिक रंग देऊन राजकीय पोळी भाजण्याचा चंद्रकांत खैरे यांचा प्रयत्न होता
  • हर्षवर्धन जाधवांना मारहाण करणाऱ्यांनाही प्रकरण भोवण्याची शक्यता

औरंगाबाद : भारतीय जनता पार्टीचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांचे जावई कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (harshvardhan jadhav) हे सतत कुठल्या ना कुठल्या विषयामुळे चर्चेत असतात. दरम्यान हर्षवर्धन जाधव यांनी २०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीबाबत (Lok Sabha election) एक खळबळजनक दावा केला आहे. शिवसेनेचे नेते तथा औरंगाबाद जिल्ह्याचे (Aurangabad district) माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीच एमआयएमचे नेते आणि औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील (MP imtiaz jaleel) यांना निवडणुकीत उभं केल्याचा खळबळजनक दावा हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. 

नेमकं काय म्हणाले हर्षवर्धन जाधव?

हर्षवर्धन जाधव हे सतत गोप्यस्फोट आणि खळबळजनक दावे करत असल्याचे अनेकवेळा त्यांना पाहायला मिळालं आहे. दरम्यान, जाधव यांनी पुन्हा एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. निवडणुकीला धार्मिक रंग देऊन राजकीय पोळी भाजण्याचा चंद्रकांत खैरे यांचा प्रयत्न होता आणि त्यामुळेच त्यांनी औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांना उभं केलं होतं. असा खळबळजनक दावा केला आहे. मात्र चंद्रकांत खैरे यांचा हा प्लॅन फसला असल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे.

 हर्षवर्धन जाधव यांनी दिले होते चॅलेंज

भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘पुढच्या निवडणुकीत घरी बसवलं नाही, तर मी माझ्या बापाची अवलाद नाही’, असं हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं होतं. त्याचबरोर रावसाहेब दानवे यांचा हा दबाव मोडून काढा आणि मला सरंक्षण द्यावं अशी मागणी देखील हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी केलेल्या टीकेमुळे रावसाहेब दानवे आणि जावई हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

हर्षवर्धन जाधवांना मारहाण करणाऱ्यांनाही प्रकरण भोवण्याची शक्यता

दरम्यान काही महिन्यांपूर्वी पुण्यातील चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हर्षवर्धन जाधवांना जामीन मिळण्यात अडचणी आल्या होत्या. मात्र त्यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी देखील आपल्याला मारहाण झाली असल्याचे सांगितले होते. मात्र, जाधव यांना मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. न्यायालयाने जाधव यांना मारहाण करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर हर्षवर्धन जाधव मारहाण करणाऱ्यांनाही प्रकरण भोवण्याची शक्यता आहे. अखेर न्यायालयाने मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी