जालना : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये डिसेंबर अखेरपर्यंत रूग्ण संख्येत वाढ झाली, तर त्यावेळी लॉकडाऊन (lockdown) हा शेवटचा पर्याय म्हणून विचार केला जाईल, असे आरोग्य मंत्री राजेश (health minister) टोपे यांनी सांगितले. लॉकडाऊन लागू केल्यानंतर होणारे आर्थिक परिणाम मोठे आहेत. त्यामुळे नागरिकांनी शासन, प्रशासनाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांचे पालन करावे. कधीही लॉकडाऊन लागू होईल अशी अफवा सध्या आसपास पसरवली जात आहे. त्याला टोपे यांनी पूर्ण विराम दिला आहे. जालना (jalna) येथे रविवारी २९ नोव्हेंबर रोजी पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत राजेश टोपे बोलत होते. दरम्यान यावेळी आमदार रोहित पवार यांच्यासह इतर नेत्यांची उपस्थित देखील उपस्थिती होती.
राज्याचे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जर डिसेंबर अखेरपर्यंत रूग्ण संख्येत मोठी वाढ झाली. तर त्यावेळी काही उपायोजनात्मक निर्माण घेतले जातील. सध्या राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही विचार राज्य शासनाचा नाही. यापूर्वी लॉकडाऊन लागू केल्यानंतर त्याचे आर्थिक परिणाम जाणवले आहेत. राज्य अनलॉक केले आहे. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून विचार केला जातो. कोरोनाच्या रूग्णसंख्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे नागरिकांनी सध्या शासन, प्रशासनाने कोरोना प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांचे पालन करावे. सध्या राज्यात लॉकडाउन लागू होणार नाही, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे टोपे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान कोरोनाच्या काळात कधी बाहेर न पडणारे आता पदवीधर निवडणुकीसाठी बाहेर पडले आहेत आणि त्यांना दोन महिन्यात भाजपची सत्ता येणार असे वाटते. परंतु रावसाहेब दानवे यांच्या त्या बोलण्याला अधिक महत्त्व देण्याची गरज नाही असं रोहित पवार म्हणाले. त्याचबरोबर पुढे रोहित पवार म्हणाले, पवार कुटुंबातील कोणता सदस्य मुख्यमंत्री होणार संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानालाही अधिक महत्त्व देण्याची गरज नाही.
रोहित पवार म्हणाले, राज्य पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत असून तिन्ही पक्षाचे पदाधिकारी एकाजुटीने काम करत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचे बहुतंशी उमेदवार निवडून येतील, असा विश्वास ही आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
कोरोनासह आपणाला जगावे लागणार आहे. लोकांनी शारीरिक अंतर राखण्याबरोबरच मास्क आणि सॅनिटायझरचा नियमितपणे वापर करणे आवश्यक आहे. गेल्या आठ महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन होता. या काळात गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांचे हाल झाले आहेत. यापुढे लाॅकडाऊनचे नाव काढू नका, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.