अडीच एकर टरबुजावर अज्ञाताकडून तणनाशक फवारणी, शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान, शेतकरी म्हणाला आता ......

Herbicide spraying by unknown person on 2.5 acres of watermelon : शेतकरी सुनील गायकवाड यांनी अडीच एकरावर टरबुजाची शेती केली शेती केली होती. गायकवाड यांनी लहान मुलाप्रमाणे त्याची देखभाल देखील केली असून, त्याला फळही चांगले लागले होते. मात्र, रात्री अज्ञात व्यक्तीने त्यावर तणनाशक फवारले आणि होत्याचं नव्हते झाले. तणनाशक फवारल्याने टरबूजाच्या सर्व वेली जळून गेल्या त्यामुळे सर्व टरबूजाचे पिक वाया गेले.

Herbicide spraying by unknown person on 2.5 acres of watermelon
अडीच एकर टरबुजावर अज्ञाताकडून तणनाशक फवारणी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • टरबुजाच्या पिकावर अज्ञात व्यक्तीने तणनाशक फवारल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान
  • माझ्याकडे बँकेचे कर्ज आहे, त्याची परतफेड कशी करावी – शेतकरी
  • रमजान महिन्यात टरबूज तोडणीला आल्याने मोठी मागणी होती

औरंगाबाद : टरबुजाच्या पिकावर अज्ञात व्यक्तीने थेट तणनाशक औषध फवारल्याने शेतकऱ्याचे तब्बल लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, तणनाशक कोणी फवारले याची माहिती मात्र अद्याप मिळाली नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. सुनील रामहरी गायकवाड असं शेतकऱ्याचे नाव असून, गायकवाड यांच्या टरबूज शेतीवर तणनाशक फवारल्याने यांचे तीन लाखांचे नुकसान झाले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तणनाशक फवारल्याने टरबूजाच्या सर्व वेली जळून गेल्या असून, शेतकऱ्याचे उभे पीक वाया गेले आहे.

अधिक वाचा ; Weight Loss Tips: वजन कमी करायचेय? खाण्यापिण्यात करा हे बदल

शेतकरी गायकवाड यांनी वीरगाव पोलीस ठाण्यामध्ये दिली तक्रार

दरम्यान, शेतकरी सुनील गायकवाड यांनी अडीच एकरावर टरबुजाची शेती केली शेती केली होती. गायकवाड यांनी लहान मुलाप्रमाणे त्याची देखभाल देखील केली असून, त्याला फळही चांगले लागले होते. मात्र, रात्री अज्ञात व्यक्तीने त्यावर तणनाशक फवारले आणि होत्याचं नव्हते झाले. तणनाशक फवारल्याने टरबूजाच्या सर्व वेली जळून गेल्या त्यामुळे सर्व टरबूजाचे पिक वाया गेले. दरम्यान, मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने गायकवाड हे प्रचंड नाराज झाले असून, त्यांनी वीरगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. याप्रकरणी वीरगाव पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून, पोलीस सदर घटनेचा तपास करत आहेत. 

अधिक वाचा ; उल्हासनगरात गर्लफ्रेंडवरून दोन गटात हाणामारी

रमजान महिन्यात टरबूज तोडणीला आल्याने मोठी मागणी होती

मुस्लीम समाजाकडून पवित्र रमजान महिन्यात रोजा सोडण्यासाठी टरबूजाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. यामुळे गायकवाड यांनी देखील आपले टरबूजाचे पिक रमजान महिन्यात विकायला येईल याची पूर्ण तयारी केली होती. गायकवाड यांच्या नियोजनानुसार पिक रमजानच्या महिन्यात विकायला आले मात्र, त्यावर अज्ञाताने तणनाशक फवारल्याने टरबूजाचे पिक वाया गेले असून, तब्बल ३ लाखाचे नुकसान झाले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. खरीप हंगाम पूर्ण वाया गेला होता, त्यामुळे रब्बी हंगामात मी टरबुजाची लागवड केली होती. रमजान महिन्यात टरबूज तोडणीला आली होती. असंही गायकवाड यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा : राज ठाकरेंची औरंगाबादेतील सभा होणार की नाही? कारण..... 

माझ्याकडे बँकेचे कर्ज आहे, त्याची परतफेड कशी करावी – शेतकरी

गायकवाड यांच्या टरबूजाच्या पिकावर तणनाशक फवारल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने ते निराश झाले आहेत. त्यांनी पोलिसात तक्रार केली असून, अद्याप पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही असं म्हटलं आहे. त्याचबरोबर माझ्याकडे बँकेचे कर्ज आहे, त्याची परतफेड कशी करावी की आत्महत्या करावी असा उद्विग्न सवाल शेतकरी सुनिल यांनी उपस्थित केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी