एक जावई गावाला भारी, हिंगोली जिल्ह्यातील घटना

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Mar 05, 2021 | 20:47 IST

Hingoli District Corona Positive Report After Marriage: नागपुरहुन आलेल्या जावयाला कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर कोरोनाबाधित जावयाच्या सासरवाडीत आणि त्यानंतर भावकीमध्ये सुद्धा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

Hingoli District Corona Positive Report After Marriage
एक जावई गावाला भारी, हिंगोली जिल्ह्यातील घटना   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • लग्नसमारंभासाठी नागपूरवरून आलेल्या एका जावईबापूलाच कोरोनाची लागण झाली होती
  • भावकी मध्ये सुद्धा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले
  • नवरी पॉझिटिव्ह असली तरी नवरदेवाचा आहवाल निगेटिव्ह

हिंगोली – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील (hingoli district) औंढा नागनाथ तालुक्यातील (aundha naganath taluka) पिंपळा गावातील सुरुवातीला तिघांना कोरोनाची (corona) लागण झाली होती. त्यानंतर सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान गावातील एकूण दहा जणांना कोरोणाची लागण झाल्याने गाव सील करण्यात आले आहे. गावात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासन खडबडून जागे झाले असून, आता संपूर्ण गावाचीच अँटीजेन टेस्ट (antigen test) केली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

लग्नसमारंभासाठी आलेल्या जावईबापूलाच कोरोनाची लागण 

त्याचं झालं असं की पिंपळा येथील एका कुटुंबात नुकताच लग्न सोहळा मोजक्याच लोकांमध्ये सोशल डिस्टन्सचे  पाळत हा लग्न सोहळा पार पडला. औंढा नागनाथ येथील बस स्थानकावर कोरोना चाचणी सुरू असताना लग्नसमारंभासाठी नागपूरवरून आलेल्या एका जावईबापूला कोरोनाची लागण झाली असल्याचे उघड झाले, मात्र, नागपुरवरून थाटामाटात आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या जावईबापूंचा अनेक लोकांशी संपर्क आला. लग्नातील नवरी, सासू, सासरे, काही नातलग यांना कोरोनाची बाधा झाल्याने आरोग्य पथक गावात दाखल झाले त्या पार्श्वभूमीवर गाव सील करण्यात आले.

भावकी मध्ये सुद्धा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले

दरम्यान, सुरुवातीला नागपूरहुन आलेल्या जावयाला कोरोनाची बाधा झाली. त्यानंतरकोरोनाबाधित जावयाच्या सासरवाडीत आणि त्यानंतर भावकी मध्ये सुद्धा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.  यात सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या घरी लग्न सोहळा पार पडला त्यांच्या घरी राशन दुकान आहे. मागील दोन दिवसापूर्वी या पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या कुटुंबाच्या घरी येऊन अख्ख्या गावाने राशन ह=घेऊन गेले आहे.  त्यामुळे ज्यांच्या शिधापत्रिका देत ज्यांनी-ज्यांनी राशन नेले अशा सर्वांचिंच अँटीजेन टेस्ट होणार असल्याचे देखील प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे. जवळपास आता गावाने राशन आणल्याने शिधापत्रिका व लाभार्थ्यांच्या रजिस्टरवर असलेल्या स्वाक्षऱ्या आदींच्या माध्यमातून गावातल्या प्रत्येकाचा संपर्क आल्याने गावात चर्चेला उधाण आलं आहे.

नवरी पॉझिटिव्ह असली तरी नवरदेवाचा आहवाल निगेटिव्ह

एका जावायामुळे संपूर्ण गावाची कोरोना चाचणी करण्यात येणार असून, यात सर्वात महत्वाच म्हणजे नवरीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी नवरदेवाचा आहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे.

कोरोना सद्यस्थिती 

महाराष्ट्रात (Maharashtra) आज ६,४६७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २०,५५,९५१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.५२% एवढे झाले आहे. आज राज्यात १०,२१६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.३८ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६६,८६,८८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,९८,३९९ (१३.१७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,१०,४११ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,२०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी