हिंगोलीत पावसाचा हाहाकार ,अनेकांचे संसार उध्वस्त, नागरिकांना सतर्क राहण्याच्या प्रशासनाच्या सूचना

hingoli district rain update news, asana river flood : कुरुंदा गावासोबत या परिसरातील इतर गावात देखील पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने नागरिकांना मदत पोहोचवण्यासाठी पथके नियुक्त केली असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच वसमत तालुक्यातील नदी काठच्या घरांची पडझड झाली आहे.

hingoli district rain update news, asana river flood
हिंगोलीत पावसाचा हाहाकार ,अनेकांचे संसार उध्वस्त,  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हिंगोली जिल्ह्यातील पावसाने हाहाकार माजवला आहे.
  • रात्रभर पडलेल्या पावसाने नदीपात्रातून पाणी थेट गावात शिरले
  • नागरिकांनी घाबरुन जावू नये, सुरक्षीतस्थळी रहावे – प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आवाहन

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील पावसाने हाहाकार माजवला आहे. रात्रभर पडलेल्या पावसाने नदीपात्रातून पाणी थेट गावात शिरले असून, त्यामुळे नागरिकांचे नोठे नुकसान होत आहे. अनेक कुटुंबांच्या संसार उपयोगी साहित्य पाण्यात वाहून देखील गेलं आहे. कुरुंदा गावाच्या परिसरात शुक्रवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात नदीकाठच्या अनेक गावांमध्ये सध्या चार फुटांपेक्षा अधिक पाणी साचलेले आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, सतत पडत असलेल्या या पावसामुळे विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून मोबाईल नेटवर्कही बाधित झाले. या पुराचा फटका आसना नदीकाठच्या अनेक गावांना बसला आहे.

अधिक वाचा : मुख्यमंत्री आता 'या' परवानगी नंतरच विठूरायाची पूजा करू शकणार

कुरुंदा गावासोबत या परिसरातील इतर गावात देखील पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे.

कुरुंदा गावासोबत या परिसरातील इतर गावात देखील पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने नागरिकांना मदत पोहोचवण्यासाठी पथके नियुक्त केली असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच वसमत तालुक्यातील नदी काठच्या घरांची पडझड झाली आहे. तर शेतात पाणी साचले असून, गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, पूरग्रस्त गावांमध्ये प्रशासनाकडून लवकरात लवकर मदत पोहोचवण्यात यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात आहे.

अधिक वाचा : अवघ्या 5 दिवसांत मुंबईत ४३ टक्के पाऊस, मुसळधार पावसाचा इशारा 

नागरिकांनी घाबरुन जावू नये, सुरक्षीतस्थळी रहावे – प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आवाहन

, गावातील उंच ठिकाणी नागरिकांनी हलवले आहे. नागरिकांनी घाबरुन जावू नये, सुरक्षीतस्थळी रहावे. रात्री बारानंतर मोठा पाऊस झाला. आता शासनाच्या टीम मदत करत आहेत. सध्या पणी कमी होत आहेवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे, अशी माहिती तहसिलदार अरविंद बोळंगे यांनी दिली.

अधिक वाचा : अवघ्या 5 दिवसांत मुंबईत ४३ टक्के पाऊस, मुसळधार पावसाचा इशारा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी