हिंगोलीत दुसऱ्या दिवसी पुन्हा अपघात , कालच झाला होता अनेकांचा मृत्यू

hingoli jeep and two wheeler accident : बाजार करून घराकडे जात असताना सदरील घटना घडली. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. सदर अपघाताची घटना ही दुचाकीवरुन तिघेजण ट्रिपल सीट प्रवास करीत असताना घडली आहे

hingoli jeep and two wheeler accident
हिंगोलीत पुन्हा अपघात ,कालच झाला होता अनेकांचा मृत्यू   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बाजार करून घराकडे जात असताना सदरील घटना घडली
  • सदर अपघाताची घटना ही दुचाकीवरुन तिघेजण ट्रिपल सीट प्रवास करीत असताना घडली
  • नांदेडवरून वारंगा फाट्याच्या दिशेने येणाऱ्या क्रुझर जीपने दुचाकीला धडक दिली

hingoli accident : हिंगोली : मराठवाड्यात अपघाताचे सत्र मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान , हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी देखील  मोठा अपघात घडला आहे. आज औरंगाबाद मध्ये देखील मोठा अपघात घडला होता. ज्यामध्ये तब्बल ६ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आज हिंगोलीत झालेल्या अपघात हा हिंगोली ते नांदेड रोडवर असलेल्या जामगव्हाण पाटी जवळ आज साडे चार वाजताच्या सुमारास जीप आणि मोटार सायकलची समोरासमोर धडक झाली. यामधे तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सुकळी वीर येथील जखमी रहिवासी आहेत.

बाजार करून घराकडे जात असताना सदरील घटना घडली

बाजार करून घराकडे जात असताना सदरील घटना घडली. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. सदर अपघाताची घटना ही दुचाकीवरुन तिघेजण ट्रिपल सीट प्रवास करीत असताना घडली आहे. नांदेडवरून वारंगा फाट्याच्या दिशेने येणाऱ्या क्रुझर जीपने दुचाकीला धडक दिली. यात नारायण गोखले वय २६ वर्ष, नामदेव कराळे वर्ष ३० वर्ष, आणि अरविंद मुकडे वय ३० वर्ष, सर्व तिघे राहणार सुकळी वीर येथील आहेत.

औरंगाबादेत सहा जणांचा मृत्यू

दरम्यान, औरंगाबादमध्ये पुन्हा एक अपघाताची मोठी घटना घडली आहे. या घटनेत तब्बल ६ जणांचा मृत्यू झाल्क्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.मिनी ट्रक आणि ऊसाच्या ट्रॅक्टरमध्ये जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर १२ जण जखमी झाले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड जवळ हा अपघात झाला आहे. या घटनेने परिसरात एकच शोककळा पसरली आहे. 

लग्नावरून परतणार्‍या छोट्या ट्रकने ऊसाचा ट्रॅक्टरला धडक दिली

मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लग्नावरून परतणार्‍या छोट्या ट्रकने ऊसाचा ट्रॅक्टरला धडक दिली आणि या अपघातात ६ प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळातच घटनास्थळी तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू कऱण्यात आले. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही गाड्यांचे अक्षरश: दोन तुकड्यांत विभाजन झाल्याचं पहायला मिळत आहे. ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले की, ट्रक चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडला का इतर दुसऱ्या कारणामुळे हा अपघात घडला याबाबत अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी