Santosh Bangar Video : आमदार संतोष बांगर यांनी शिवीगाळ करत लगावली कानशिलात, व्हिडिओ व्हायरल 

उद्धव ठाकरे गटातून पलटी घेत शिंदे गटामध्ये सामील झालेले हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी एकाला शिवीगाळ करत कानशिलात लगावल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Hingoli Mla santosh bangar slap midday meal mangaer video Viral
आमदार संतोष बांगर यांनी शिवीगाळ करत लगावली कानशिलात 
थोडं पण कामाचं
  • हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी एकाला शिवीगाळ करत कानशिलात लगावल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
  • कामगारांसाठी असलेल्या मिड डे मिल योजनेत निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचा आरोप
  • हिंगोली जिल्ह्यामध्ये कामगार विभागामार्फत बांधकामांवरील कामगारांना मोफत मिड डे मिल वाटप केले जाते.

हिंगोली : उद्धव ठाकरे गटातून पलटी घेत शिंदे गटामध्ये सामील झालेले हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी एकाला शिवीगाळ करत कानशिलात लगावल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.  ( Hingoli Mla santosh bangar slap midday meal mangaer video Viral)

अधिक वाचा :  रिअल लाइफमध्ये खूप ग्लॅमरस आहे भाग्य दिले तू मलाची कावेरी


कामगारांसाठी असलेल्या मिड डे मिल योजनेत निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचा आरोप करत शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी  एका उपहारगृहाची पाहणी केली. त्यावेळी तेथील परिस्थिती पाहून आमदार बांगर यांचा राग अनावर झाला. यावेळी त्यांनी शिवीगाळ करत मॅनेजरला एकदा नाही तीन वेळा कानशिलात भडकवल्या. 

अधिक वाचा :  प्राजक्ता माळीकडून फॅशन डिझायनरला मारहाण खरं की खोटं

हिंगोली जिल्ह्यामध्ये कामगार विभागामार्फत बांधकामांवरील कामगारांना मोफत मिड डे मिल वाटप केले जाते. यासाठी शहराजवळील एमआयडीसी भागात जिल्ह्यातील कामगारांसाठी एकत्रित अन्न शिजवले जात असते. या ठिकाणाहून हे अन्न जिल्ह्यातील कामगारांना दुपारच्या वेळी दिले जाते..

दरम्यान, आमदार बांगर यांच्याकडे या निकृष्ट जेवणाविषयी तक्रार आली होती. त्यामुळे आज आमदार बांगर यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळी कामगारांसाठी शिजवण्यात येणारे हे अन्न अत्यंत निकृष्ट दर्जाचे आढळून आले आहे. बुरशीजन्य डाळी, भाज्या, करपलेल्या चपात्या आणि अन्न शिजवण्याच्या ठिकाणी घाण आढळून आल्याने बांगर चांगलेच संतप्त झाले. तसेच सकाळी आणि संध्याकाळी जे भोजन दिले जाते त्याची यादी बांगर यांनी वाचून दाखवली. त्यात खूप मोठ्या प्रमाणात तफावत होती. 

अधिक वाचा :  कियारा आडवाणीचा लूक, मलायका अन् जान्हवीलाही विसराल

संतप्त झालेल्या आमदार संतोष बांगर यांनी व्यवस्थापकाला आणि कंत्राटदाराला या प्रकाराचा जाब विचारला. पण उडवाउडवीची उत्तरे मिळाल्यामुळे आमदार बांगर यांनी तिथे उपस्थित मॅनेजरच्या  तीन वेळा कानशिलात लगावली. तसेच शिवीगाळही केली. त्यांचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरे गटात असताना शिंदे गटातील आमदारांवर तोंड सुख घेतले होते. पण नंतर विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर पलटली खात शिंदे गटात सामील झाले होते. त्यानंतर त्यांनी आपल्याला कोणी गद्दार म्हटले तर त्याच्या कानाखाली आवाज काढण्याचे फर्मान काढले होते. गद्दार म्हटले म्हणून नाही तर कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी मॅनेजरच्या कानाखाली लगावली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी