महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शेकडो लोक अडकले

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Mar 29, 2020 | 11:12 IST

तेलंगणामधील शेकडो नागरिक हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर अडकून पडले आहेत. यावेळी कर्नाटकमध्ये प्रवेश करणाऱ्या अनेक नागरिकांना कर्नाटक पोलिसांकडून मारहाण केली जात आहे. 

hundreds of people were stranded on the maharashtra karnataka border
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शेकडो लोक अडकले  |  फोटो सौजन्य: Times Now

उस्मानाबाद: उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा येथे कर्नाटक कडे जाणारी सीमारेषा आहे. पण या सीमेवरच तेलंगणातील शेकडो लोक अडकले असल्याची माहिती समोर येत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लोक आपापल्या गावाकडे जात आहेत. काही लोक तर चालत शेकडो किलोमीटरचे अंतर पायी कापत आहेत. गाडीतून प्रवास करणाऱ्यांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पुणे आणि मुंबई येथून बाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई येथे अनेक राज्यातील लोक देखील मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना सीमा ओलांडून जाणे हे अवघड आहे.

अशाच प्रकारे तेलंगणा राज्यातील लोक उस्मानाबाद जिल्ह्यात महाराष्ट्र-कर्नाटक या सीमेवर अडकून पडले आहेत.
या शेकडो लोकांची राहण्याची व्यवस्था पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे. तसेच सीमा ओलांडून गेलेल्या या लोकांना कर्नाटक पोलिसांनी जबर मारहाण केली असल्याची माहिती देखील या नागरिकांनी दिली आहे. हे सर्व लोक आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यातील असून या राज्यात जाण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा ओलांडून जावं लागतं आहे. मात्र कर्नाटक पोलीस त्यांना सीमा भागात येऊ देत नाही. 

नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्यांना महाराष्ट्र पोलीस आणि लोकांनी सहकार्य केले असून तेलंगणा सरकार च्या मदतीची गरज आहे. मात्र स्वतःच्या राज्यातील सरकार देखील मदत करत नसल्याची खंत देखील या लोकांनी बोलून दाखवली. हे नागरिक दोन दिवसांपासून महाराष्ट्रच्या सीमा भागात असून स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी त्यांच्या राहण्याची सोय केली आहे.

भारतात आतापर्यंत ९३३ रुग्ण आढळले! 

भारतात कोरोना व्हायरसची संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत एकूण १०३७ रुग्ण आढळून आले आहेत. या विषाणूमुळे आतापर्यंत २५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ८५ रुग्ण हे बरे झाले आहेत.

जगाचा विचार केला तर आतापर्यंत कोरोनाचे एकूण रुग्णांची संख्या 6 लाखांहून अधिक झाली आहे. तर संपूर्ण जगात कोरोनामुळे २७,००० हून अधिक लोक मरण पावले आहेत. इटलीमध्ये एका दिवसात एक हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी