वांग्याची भाजी संपली म्हणून पत्नीला जीवंत जाळले

husband burned his wife alive भाजी संपली म्हणून पतीने पत्नीला जीवंत जाळले. लातूर जिल्ह्यातील या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली.

husband burned his wife alive
वांग्याची भाजी संपली म्हणून पत्नीला जीवंत जाळले  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • वांग्याच्या भाजीसाठी पती पत्नीत झाला होता वाद
  • पीडित महिलेल्या लातूरमधील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं
  • मद्यधुंद असणाऱ्या शादुलने बायकोला सकाळी केलेल्या वांग्याची भाजी जेवायला मागितली

लातूर : संसाराचा गाडा हाकत असताना नवरा बायकोमध्ये अनेकवेळा लहान लहान कारणावरून वाद होत असल्याचे पाहायला मिळतात. हा वाद टाळण्यासाठी अनेकवेळा लहान लहान गोष्टीकडे दुर्लक्ष करणे हाच याचा पर्याय असतो, मात्र, दोघेही हमरीतुमरीवर आल्यावर काहीना काही विपरीत घडल्याशिवाय राहत नाही. अशीच एक घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. लातूर (Latur) जिल्ह्यातील हेर येथील एका युवकाने आपल्या पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून जाळल्याची घटना घडली आहे. सदर घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. husband burned his wife alive

वांग्याच्या भाजीसाठी पती पत्नीत झाला होता वाद

शादुल शेख असं आरोपी पतीचं नाव आहे. तर फर्जाना शेख असं पत्नीचे नाव आहे. या दोघा पती पत्नी मध्ये वांग्याच्या भाजीसाठी (Brinjal Curry) वाद सुरू झाला होता. हा वाद विकोपाला गेला आणि याच वादातून आपल्या पत्नीवर रॉकेल ओतून पती शादुल शेख याने पेटवून (husband burned his wife alive) दिल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत आरोपीची पत्नी गंभीररित्या जखमी झाली आहे.

पीडित महिलेल्या लातूरमधील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं

रॉकेलने जाळल्या नंतर आगीने चांगलाच पेट घेतला होता. यात पीडित पत्नी फर्जाना शेख यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी भाजलं गेलं आहे. पीडित महिलेल्या लातूरमधील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

मद्यधुंद असणाऱ्या शादुलने बायकोला सकाळी केलेल्या वांग्याची भाजी जेवायला मागितली

फर्जाना शेखने वांग्याची भाजी बनवली होती. मात्र , वांग्याची भाजी संपल्यावर मद्यधुंद असणाऱ्या शादुलने बायकोला सकाळी केलेल्या वांग्याची भाजी जेवायला मागितली असता फर्जाना यांनी वांग्याची भाजी सकाळी केली होती त्यामुळे ती आता संपल्याचं पतीला सांगितलं. यावेळी आरोपी पती शादुल आणि फर्जाना यांच्यात किरकोळ वाद झाला. या वादामुळे शादुल घरी जेवण न करताच निघून गेला. पण रात्री शादुल दारू पिऊन घरी आला. 

शादुलने वांग्याची भाजीच पाहिजे असा हट्ट धरला

पती शादुल घरी पिऊन आला आणि त्याने पत्नी फर्जाना जवळ वांग्याची भाजीच पाहिजे असा आग्रह धरला. तिने पुन्हा पतीला वांग्याची भाजी संपली असं सांगितलं आणि यामुळे दोघांत पुन्हा वादाला सुरुवात झाली. पत्नीनं वांग्याची भाजी संपल्याच सांगितल्यानं पतीने रागाच्या भरात पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिलं. या दुर्दैवी घटनेत पत्नी फर्जाना शेख गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. अवघी हजार-दीड हजार लोकसंख्या असणाऱ्या या हेर गावात या घटनेनं खळबळ उडाली आहे.

फर्जाना यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार केला जात आहे

या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती शादूल शेखला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.दरम्यान, या दुर्घटनेत अतिशय गंभीर भाजलेल्या फर्जाना शेख यांना गावकऱ्यांनी लातूरच्या सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं. फर्जाना यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार केला जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी