औरगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर लगेच पतीने देखील प्राण सोडले असल्याचं समोर आहे. जिजाबाई बिसनराव ढाकणे असे पत्नीचे नाव आहे. जिजाबाई यांचं वय ७४ वर्षे इतकं होत. तर बिसनराव दगडु ढाकणे असे पतीचे नाव आहे. बिसनराव यांचे वय ७८ वर्षे इतकं होत. पहिल्यांदा पत्नी जिजाबाई यांचा मृत्यू झाला. जिजाबाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू होती. यावेळी पत्नीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पती बिसनराव यांनी देखील प्राण सोडले. सदर घटना औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील ब्राम्हणगांव येथे समोर आली आहे. या दोघा पती पत्नीच्या एकदम आणि अचानकपणे जाण्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिजाबाई यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू असताना लेगच पतीने देखील आपले प्राण सोडले असल्याचे समोर आले आहे. 'साथ जियेंगे-साथ मरेंगे' याप्रमाणे दोघेही आयुष्यभर एकमेकांची साथ दिल्याचे अनेक उदाहरणं आहेत. दरम्यान, अशीच घटना औरंगाबाद जिल्ह्यातील ब्राम्हणगाव या गावात घडली आहे. सध्या आयुष्यात आपण पाहतो की, लग्नानंतर काही दिवसातच काही पती पत्नी लगेच एकमेकांना सोडून वेगळे होतात. आणि आपला दुसरा संसार थाटतात मात्र, आयुष्यभर एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या अशा पती पत्नीच्या प्रेमाची तुलना इतर कोणाशीही करता येत नाही.
सदर घटनेमुळे ढाकणे कुटुंबातील सदस्यांवर दु;खाचे डोंगर कोसळले आहे. पत्नीनंतर पतीनेही प्राण सोडल्याने ढाकणे कुटुंबात शोककळा होती. या दोन्ही वृद्ध पती- पत्नीच्या पार्थिवावर ब्राम्हणगावातील स्मशानभूमीत रविवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी, घरात सर्वत्र मोठमोठ्याने रडारड सुरु होती. अशावेळी एकाचवेळी दोघांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यांनतर पती-पत्नीच्या प्रेताला सोबतच एकाच दिवशी अग्निडाग देण्यात आल्याने उपस्थित ग्रामस्थ व नातेवाईकांच्या डोळ्यातून अश्रूंचा मोठा बांध फुटला होता.