बायकोवर बलात्कार करत होता मित्र, अन् पती करत होता 'हे' काम

husband forced friend to rape his wife : आरोपी पतीवर पत्नीने अनेक गंभीर आरोप केले आहेत. आरोपी पतीने यापूर्वी देखील चारित्र्यावर संशय घेत अनेकदा मानसिक त्रास दिल्याचा आरोप पीडित पत्नीने पोलिसांना दिलेल्या आपल्या तक्रारीत म्हटलं आहे

husband forced friend to rape his wife
बायकोवर बलात्कार करत होता मित्र, अन् पती करत होता 'हे' काम   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आरोपी पती घराबाहेर थांबून मित्राला घरात पाठवून स्वत:च्या पत्नीवर बलात्कार घडवून आणला
  • पोलिसांनी पीडित महिलेच्या पतीसह त्याच्या मित्राविरोधात बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला
  • आरोपी पतीने यापूर्वी देखील चारित्र्यावर संशय घेत अनेकदा मानसिक त्रास दिल्याचा आरोप

हिंगोली : गेल्या काही महिन्यापासून मराठवाड्यात महिलांवर अत्याच्याराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं पहायला मिळाले आहे. मराठवाड्यातील हिंगोलीत तर एक विचित्र घटना घडल्याचं समोर आले आहे. मित्रानेच आपल्या मित्राच्या पत्नीवर बलात्कार केला आहे. यापेक्षा भयानक म्हणजे मित्र बायकोवर बलात्कार करत असताना त्याला पहारा देखील पतीनेचं दिला असल्याची धक्काद्यक घटना समोर आली आहे. दरम्यान, पीडित महिला घरी एकटी असल्याचं पाहून आरोपी पती मित्राला घरी घेऊन आला होता. यावेळी त्याने आपल्या मित्राला घरात पाठवून पत्नीवर बलात्कार करायला सांगितला असल्याची माहिती मिळाली आहे. सदर घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आपल्यावर झालेल्या अत्याच्याराची महिलेने वाचा फोडत हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी पतीसह त्याच्या मित्राविरोधात बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

आरोपी पती घराबाहेर थांबून मित्राला घरात पाठवून स्वत:च्या पत्नीवर बलात्कार घडवून आणला

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पती आपला मित्र माधव जोगदंड याला घरी घेऊन आला होता. यावेळी आरोपी पती घराबाहेर थांबून मित्राला घरात पाठवून स्वत:च्या पत्नीवर बलात्कार घडवून आणला आहे. सदर घटना हिंगोली जिल्ह्यातील सवड या गावात घडली आहे. घटनेच्या दिवशी गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास पीडित महिला घरी एकटीच होती. यावेळी यावेळी विकृत पती घराबाहेर उभा राहून पहारा देत आपल्या मित्राला घरात पाठवून महिलेवर बलात्कार करायला लावायचा.

आरोपी पतीने यापूर्वी देखील चारित्र्यावर संशय घेत अनेकदा मानसिक त्रास दिल्याचा आरोप

दरम्यान, आरोपी पतीवर पत्नीने अनेक गंभीर आरोप केले आहेत. आरोपी पतीने यापूर्वी देखील चारित्र्यावर संशय घेत अनेकदा मानसिक त्रास दिल्याचा आरोप पीडित पत्नीने पोलिसांना दिलेल्या आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. यानंतर त्याने हद्दच पार करत मित्राकडून पत्नीवर बलात्कार घडवून आणला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नाही. या घटनेचा सविस्तर तपास हिंगोली ग्रामीण पोलीस करत आहेत. 

पोलिसांनी पीडित महिलेच्या पतीसह त्याच्या मित्राविरोधात बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला

दरम्यान, आरोपी नराधम मित्राने देखील मैत्रीला काळिमा फासत मित्राच्या पत्नीला आणि तिच्या मुलीला चाकुचा धाक दाखवून जबरी अत्याचार केल्याचा देखील प्रकार घडला आहे. या धक्कादायक घडल्यानंतर पीडित महिलेनं हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पीडित महिलेच्या पतीसह त्याच्या मित्राविरोधात बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पोलीस याप्रकरणी तपास करत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी