'या' कारणामुळे पतीने पत्नीला तब्बल ४ ते ५ वर्षापासून ठेवलं होत डांबून, बाहेर आल्यावर पत्नीची 'अशी' झाली होती अवस्था, बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना, पहा व्हिडीओ

husband keeps wife in house for 4 to 5 years : पिडीत महिलेचे नाव रूपाली किन्हिकर असं आहे. जेव्हा रुपाली यांची घराबाहेर सुटका करण्यात आली तेव्हा त्यांनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. त्यांनी सांगितले की, गेल्या १७ वर्षांपासून मला बाहेर जाऊ देत नाहीत, संशय घेतात पाच-सहा वर्षांपूर्वी घराच्या बाहेर आले होते. त्यानंतर आज बाहेर निघाली आहे. माझी दोन मुलं असून, त्यांना देख्हील मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात देत मारहाण करत असल्याचं महिलेने सांगितले आहे

husband keeps wife in house for 4 to 5 years
'या' कारणामुळे पतीने पत्नीला ४ते ५ वर्षापासून ठेवलं डांबून   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पतीने पत्नीला चक्क एक दोन नव्हे तर तब्बल ४ ते ५ वर्षे घरातचं डांबून ठेवले होते
  • पाच-सहा वर्षांपूर्वी घराच्या बाहेर आले होते – पिडीत महिला
  • पीडित महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे

बीड : बीड जिल्ह्यात चारित्र्याच्या संशयावरून पतीकडूनचं पत्नीला नरकयातना दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीने पत्नीला चक्क एक दोन नव्हे तर तब्बल ४ ते ५ वर्षे घरातचं डांबून ठेवले होते. मात्र, पोलीस आणि पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मिळून आज या महिलेची आपल्याच घरून सुटका केली आहे. महिला जेव्हा घराबाहेर पडली तेव्हा तिला नीट चालता देखील येत नव्हते. तिची अवस्था पार वाईट झाल्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी देखील आल्याचं पहायला मिळाले. बीड शहरातील जालना रोडवर उघडकीस आला आहे. डांबून ठेवलेल्या पत्नीला पती सतत मारहाण देखील करत असल्याचं दिसून आले आहे. कारण पत्नीच्या अंगावर अनेक जखमा दिसून येत होत्या. पिडीत महिलेसोबत तिचे दोन मुलं देखिल पतीच्या दहशतीखाली दहशितीखाली वावरत होती.  

अधिक वाचा : Hanuman jayanti 2022:हनुमान जयंतीला जरूर करा हे उपाय

पाच-सहा वर्षांपूर्वी घराच्या बाहेर आले होते – पिडीत महिला

दरम्यान, पिडीत महिलेचे नाव रूपाली किन्हिकर असं आहे. जेव्हा रुपाली यांची घराबाहेर सुटका करण्यात आली तेव्हा त्यांनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. त्यांनी सांगितले की, गेल्या १७ वर्षांपासून मला बाहेर जाऊ देत नाहीत, संशय घेतात पाच-सहा वर्षांपूर्वी घराच्या बाहेर आले होते. त्यानंतर आज बाहेर निघाली आहे. माझी दोन मुलं असून, त्यांना देख्हील मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात देत मारहाण करत असल्याचं महिलेने सांगितले आहे. गेल्या २० वर्षापूर्वी सदर महिलेचा आणि मनोज किन्हिकर यांचा विवाह झाला होता. मात्र सुरुवातीच्या दोन-तीन वर्ष आनंदात गेले त्यानंतर चारित्र्यावर संशय घेऊन पतीने त्रास द्यायला सुरुवात केली. एका दुकानावर कामाला जात होती मात्र पतीला माझ्यावर संशय आल्याने ते देखील बंद झालं. असं रुपाली किन्हिकर यांनी सांगितले. रुपाली किन्हिकर यांना पतीकडून मिळालेल्या नरकयातनेनंतर नराधम पतीस कठोर शिक्षा केली  जावी अशी मागणी देखील सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. त्याचबरोबर, पुरोगामी समजणाऱ्या महाराष्ट्रात आज देखील महिलावरील अत्याचार कमी होत नाहीत तर पति कढूनच नरक यातना दिल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खरंच माणुसकी जिवंत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.   

अधिक वाचा : आयएनएस विक्रांतसाठी जमवलेले पैसे भाजपला दिले 

पीडित महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे

शिवाजी नगर पोलीस स्टेशनला तक्रार आल्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी सामान्य माणूस पाच मिनिटे देखील कोणत वासाने थांबू शकणार नाही अशा ठिकाणी पीडित महिला व तिची दोन मुलं राहत होती. त्यांची आम्ही सुटका केली असून पीडित महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे असं पोलीस कॉन्स्टेबल पठाण यांनी सांगितलं. त्याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार, वडील मरण पावले तर अंत्यविधीला देखील जाऊ दिले नाही.

अधिक वाचा : खराब कामगिरीमुळे अजिंक्य रहाणे क्रिकेटला करणार रामराम?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी