पतीचे नको ते व्हिडिओ पत्नीने पाहिले, त्याने पत्नीला पेटवूनच दिले

औरंगाबाद
Updated Feb 13, 2020 | 17:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

पतीने आपल्या पत्नीला जिवंत जाळल्याचा प्रकार अहमदनगरमध्ये उघडकीस आला आहे. पत्नीने आपल्या अनैतिक संबंधांचे व्हिडिओ पाहिल्याने संतापाच्या भरात पतीने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

fire
पतीचे नको ते व्हिडिओ पत्नीने पाहिले, त्याने पत्नीला पेटवूनच दिले  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • पतीने आपल्या पत्नीला जिवंत जाळल्याचा प्रकार अहमदनगरमध्ये उघडकीस आला आहे.
  • पत्नीने आपल्या अनैतिक संबंधांचे व्हिडिओ पाहिल्याने संतापाच्या भरात पतीने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.
  • पत्नीला पेटवल्यानंतर या नराधम पतीने घरातून पळ काढला आहे. तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

अहमदनगर: पतीने आपल्या पत्नीला जिवंत जाळल्याचा प्रकार अहमदनगरमध्ये उघडकीस आला आहे. पत्नीने आपल्या अनैतिक संबंधांचे व्हिडिओ पाहिल्याने संतापाच्या भरात पतीने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. पत्नीला पेटवल्यानंतर या नराधम पतीने घरातून पळ काढला आहे. तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हिंगणघाट येथील जळीतकांडाचं प्रकरण ताजं असतानाच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

अहमदनगरमधील नेवासे तालुक्यातील मोरेचिंचोरा येथे ही घटना घडली आहे. शंकर दुर्गे असे या आरोपीचे नाव आहे. या आरोपीचे एका दुसऱ्या महिलेसोबत अनेक संबंध होते. या महिलेसोबतच्या अनैतिक संबंधांचे व्हिडिओ त्याने बनवले होते. तसेच दोघांचे फोटोही त्याने काढले होते. मात्र ते फोटो आणि व्हिडिओ डिलीट करण्यास तो विसरला. नेमके पतीचा फोन पत्नीच्या हाती लागल्.वर तिने फोटो आणि व्हिडिओ पाहिले. हे सर्व पाहून पत्नीने त्याला जाब विचारला असता शंकर घाबरून बिथरला. यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडणही झाले. तेव्हा पत्नीने ही बाब सर्वांना सांगणार असल्याची धमकी त्याला दिली. आपले बिंग नातेवाईक तसेच शेजाऱ्यांसमोर फुटेल या भीतीने संतापाच्या भरात त्याने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले आणि तिथून पसार झाला.

पत्नीला पेटवून दिल्यानंतर शंकरने लागलेच घरातून पळ काढला. शेजाऱ्यांच्या मदतीने या पीडित महिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सोनई पोलीस स्टेशनमध्ये शंकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

काही दिवसांपूर्वी हिंगणघाटमध्येही एकतर्फी प्रेमातून तरूणीला पेटवून देण्यात आल्याचा प्रकार घडला होता. आठ दिवसांच्या उपचारांनंतर अखेर त्या तरूणीचा मृत्यू झाला होता. या घटनेने हिंगणघाट परिसरात शोककळा पसरली होती. तसेच तरूणीच्या मृत्यूनंतर नागरिकांनी रस्त्यावर उतरत या घटनेचा निषेध व्यक्त केला होता. ही घटना ताजी असतानाच नगरमध्ये विवाहितेला पेटवून देण्याच्या या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी