Rajesh Tope : तर पुन्हा मास्कसक्ती करावी लागेल, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला इशारा

देशात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात जर पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर पुन्हा मास्कसक्ती करावी लागेल असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. तसेच राज्यात वेगाने लसीकरण व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असेही टोपे म्हणाले.

rajesh tope
राजेश टोपे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • देशात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
  • राज्यात जर पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर पुन्हा मास्कसक्ती करावी लागेल
  • राज्यात वेगाने लसीकरण व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील

Rajesh Tope : जालना : देशात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात जर पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर पुन्हा मास्कसक्ती करावी लागेल असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. तसेच राज्यात वेगाने लसीकरण व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असेही टोपे म्हणाले. आज महाराष्ट्र दिनी जालन्यात उपस्थित होते, तेव्हा माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. (If Covid19 cases continue to rise, then we will have to make the wearing of masks compulsory says maharashtra health minister)

टोप म्हणाले, की कोरोना संख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात सध्या आठवा क्रमांक आहे. आपण वेगाने लसीकरण केल्याने हा परिणाम दिसून आला आहे. असे असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास पुन्हा मास्क सक्ती करावी लागेल. राज्यात वेगाने लसीकरण व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यातील सर्व वयोगटातील लोकांचे लसीकरण होण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचेही टोपे म्हणाले. 

महाराष्ट्रात ९९८ कोरोना सक्रिय रुग्ण

महाराष्ट्रात काल  १५५ कोरोनाचे  रुग्ण  आढळले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत १३५ रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या  ७७ लाख २८ हजार ८९१ वर पोहोचली आहे.. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४७ हजार ८४३ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ८ कोटी १ लाख ८८ हजार १४५ कोरोना चाचण्यांपैकी ७८ लाख ७७ हजार ७३२ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८७ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.८२ टक्के, रिकव्हरी रेट ९८.११ टक्के आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी