Crime News पोलीस थेट लॉजमध्ये घुसले, आणि समोर आली धक्कादायक घटना

Illegal prostitution was going on at a lodge in Tuljapur ; तुळजापूर शहरात देहविक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.  घाटशीळ रोड पार्किंगजवळ असणाऱ्या भक्त निवास (लॉज) वर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व तुळजापूर पोलिसांनी अचानकपणे छापा टाकला असता देहविक्री करणाऱ्या दोन महिला व दोन पुरुषांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

Illegal prostitution was going on at a lodge in Tuljapur
पोलीस थेट लॉजमध्ये घुसले, आणि समोर आली धक्कादायक घटना   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तुळजापूर शहरात देहविक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे
  • देहविक्री सुरु असल्याची माहिती खबऱ्याद्वारे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकास लागली होती
  • दोन व्यक्तींविरोधात पोलिसात दाखल करण्यात आला गुन्हा

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तुळजापूर शहरात देहविक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.  घाटशीळ रोड पार्किंगजवळ असणाऱ्या भक्त निवास (लॉज) वर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व तुळजापूर पोलिसांनी अचानकपणे छापा टाकला असता देहविक्री करणाऱ्या दोन महिला व दोन पुरुषांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

अधिक वाचा ; घर खरेदी करतांय? मग या गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर पश्चाताप

देहविक्री सुरु असल्याची माहिती खबऱ्याद्वारे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकास लागली होती

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त खबऱ्याद्वारे उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेला आणि तुळजापूर पोलिसांना तुळजापूर शहरातील तुळजाभवानी भक्त निवास (लॉज) वर अवैध देहविक्री सुरु असल्याची मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सदर लॉजवर पाळत ठेवली असता काल संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शहरातील घाटशीळ रोड पार्किंगजवळ असणाऱ्या तुळजाभवानी भक्त निवास (लॉज) वर अवैद्य देहविक्रीचा व्यवसाय चालणाऱ्या लॉजवर छापा मारला. पोलिसांनी छापा मारला असता सदर लॉजमध्ये इतर जिल्ह्यामधून आलेल्या पीडित दोन महिला व दोन पुरुष असं एकूण चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा : या एका शेअरवर मिळणार मोफत 9 शेअर्स, गुंतवणुकदारांच्या उड्या 

या व्यक्तीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

दरम्यान, बाबासाहेब सुरेश सोनवणे (वय 33) संतोष भीमराव यादव (वय 42) वर्ष यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळजापूर पोलीस स्टेशन येथे स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज धोंडीबा निलंगेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद हे करत आहेत.

अधिक वाचा ; T20 World Cup: सेमीफायनल हरल्यानंतर हार्दिक पांड्या कोलमडला

अधिक वाचा ; फक्त 7000 रुपयांमध्ये नोकियाने आणला जबरदस्त 5G स्मार्टफोन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी