बीड जिल्ह्यात शेतीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी, गुन्हा दाखल करण्यासाठी जखमींचा ठाण्यात ठिय्या

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Jun 10, 2021 | 18:34 IST

In Beed district, two groups clashed over an agricultural dispute: हाणामारीत अनुराज याला डोक्यात कुऱ्हाडीचा मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून, तो रक्तबंबाळ देखील झाला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत

In Beed district, two groups clashed over an agricultural dispute
बीड जिल्ह्यात शेतीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • सात जणांनी संगणमत करुन तिघांवर केला प्राणघातक हल्ला
  • अनुराज याला डोक्यात कुर्हाडीचा गंभीर घाव
  • आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी

बीड – बीड जिल्ह्यात सतत हाणामारीच्या घटना समोर येतात. दरम्यान, बीड जिल्ह्याच्या गेवराई मध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. शेतीच्या वादातून दोन गटांमध्ये थोडा वाद झाला मात्र त्या वादाचे रुपांतर तुंबळ हाणामारीत झाले असल्याचे पाह्यला मिळाले आहे. या हाणामारीचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, सदर हाणामारीची घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावात झाली आहे. हे भांडण शेत जमिनीच्या बांधावरुन भांडण सुरुवातीला मात्र, किरकोळ वाटत होते. पंरतु, या किरकोळ भांडनाचे रुपांतर तुफान हाणामारी झाले.

सात जणांनी संगणमत करुन तिघांवर केला प्राणघातक हल्ला

शेतरस्त्याच्या झालेल्या या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला असून मारहाण करणाऱ्या लोकांवर तात्काळ गुन्हा दाखल करा अशी मागणी जखमी झालेल्यांनी केली आहे. त्याशिवाय आम्ही येथून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत पोलिस ठाण्यातचं ठिय्या मांडला होता. दरम्यान, सात जणांनी संगणमत करुन तिघांवर प्राणघातक हल्ला केलाचे बोलले जात आहे. वरिष्ठ पोलिसांच्या आश्वासनानंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

काय आहे नेमकी घटना?

सविताबाई थोरात यांची गेवराई तालुक्यातील लुखामसला शिवारात गट नं.१६ मध्ये शेत जमीन असून या रस्त्यावरून सविताबाई थोरात व त्यांची दोन मुले अनुराज थोरात, केशव थोरात यांनी शेतात ऊस लागवडीसाठी ट्रँक्टरमधून बेणे नेले होते. यावरून, तुम्ही रस्त्यावरून ट्रँक्टर का नेले या कारणावरून दोन गटात बाचाबाची सुरु झाली. त्यानंतर शुभम वसंत व्हरकटे, वसंत व्हरकटे, नंदकुमार अंकुश सरगर, रावसाहेब दगडूबा व्हरकटे, करण वसंत व्हरकटे, रेखा वसंत व्हरकटे, दिव्या वसंत व्हरकटे यांनी वाद घालत संगणमत करुन काठी कुर्हाडीने थोरात बंधूसह त्यांच्या आईला मारहाण करण्यास सुरुवात केली.

अनुराज याला डोक्यात कुर्हाडीचा गंभीर घाव

सदर हाणामारीत अनुराज याला डोक्यात कुऱ्हाडीचा मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून, तो रक्तबंबाळ देखील झाला होता. त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन गंभीर मार लागल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर आई सविताबाई व केशव यांना देखील काठीने जबर मारहाण करण्यात आली असून, जखमी तिघांनाही गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी

ठाणे अंमलदार व बीट अंमलदार देशमुख यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला असून, जखमींनी पोलिस ठाणे गाठून वरील आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ठाण्यातचं ठिय्या मांडला. यावेळी पोलिस निरीक्षक रविंद्र पेलगुरवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी तुमच्यावर अन्याय होणार नाही, आरोपींवर योग्य कारवाई करण्यात येईल. असे आश्वासन दिले असून, तुम्ही अगोदर उपचार घ्या, जिल्हा रुग्णालयात जवाब घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना तात्काळ पाठविण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान यापुर्वी देखील आरोपींनी आम्हाला मारहाण केली होती, यामुळं कारवाई करा अशी मागणी थोरात कुटुंबियांनी केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी