Jalna Jail: ब्रश करता-करता कैद्याचा तुरुंगातच मृत्यू, नेमकी घटना काय?

औरंगाबाद
रोहित गोळे
Updated Jul 27, 2022 | 17:55 IST

Prisoner died in the jail:जालना तुरुंगातील एका आरोपीचा तुरुंगातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, तुरुंगातच हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

in jalna while brushing he suddenly fell down prisoner died in the jail in just a few minutes
ब्रश करता-करता कैद्याचा तुरुंगातच मृत्यू, नेमकी घटना काय?  
थोडं पण कामाचं
  • जालन्यात एका कैद्याचा तुरुंगातच मृत्यू
  • ब्रश करतानाच कैद्याला तीव्र हृदयविकाराचा झटका
  • आरोपी पत्नी आणि मुलांच्या हत्येच्या आरोपाखाली होता तुरुंगात

Prisoner Death: जालना: ब्रश करता-करता अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका (Heart Attack) येऊन एका कैद्याचा (prisoner) तुरुंगातच (Jail) मृत्यू (Died) झाल्याची धक्कादायक घटना जालन्यात (Jalna) घडली आहे. गणेश सातारे असं मृत्यू झालेल्या कैद्याचं नाव आहे. या घटनेमुळे जालना कारागृह आणि पोलीस प्रशासन यांच्यात एकच खळबळ उडाली आहे. (in jalna while brushing he suddenly fell down prisoner died in the jail in just a few minutes)

मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्हा कारागृहात ही घटना घडली आहे. सातारे याने त्याच्या पत्नीसह मुलीची हत्या केली होती. याच हत्येच्या प्रकरणात तो जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत होता. पण काल (२६ जुलै) ब्रश करताना त्याला हृदयविकाराचा झटका  आला आणि तो खाली कोसळला. या घटनेनंतर काही वेळेतच त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

अधिक वाचा: Umesh Kolhe Case Video : उमेश कोल्हेच्या हत्येच्या आरोपात जेलमध्ये असलेल्या शाहरूखला कैद्यांनी चोपले

दरम्यान, या प्रकरणी जालना जिल्हा कारागृहाचे पोलीस उपअधीक्षक आशिष गोसावी यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, 'गणेश सातारे हा आरोपी ३०२ या कलमाखाली तुरुंगात होता. २६ तारखेला सकाळी ७.१५ ते ७.३० वाजेच्या दरम्यान तो चक्कर येऊन पडला. त्यामुळे आम्ही त्याला तात्काळ सामान्य रुग्णालय जालना येथे दाखल केलं. अगदी पाच ते सात मिनिटातच त्याला रुग्णालयात नेलं आम्ही. त्यानंतर ८.१५ वाजेच्या दरम्यान त्याला रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केलं.' 

'आता त्याच्यावर शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यासाठी मृतदेह औरंगाबाद घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक कारवाई सुरु आहे.' अशी माहिती त्यांनी दिली. 

आरोपीचा नेमका मृत्यू कसा झाला यामागचं नेमकं कारण हे शवविच्छेदन अहवालानंतरच समजू शकणार आहे. मात्र, डॉक्टरांच्या मते त्याचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्यानेच झाला आहे. मात्र, असं असलं तरी या मृत्यूप्रकरणी आता सखोल चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा: घरातून निघालेली तरुणी परतलीच नाही, नंतर जे घडलं ते....

दरम्यान, या सगळ्या प्रकरणानंतर जालनामध्ये मात्र खळबळ उडाली आहे. तसेच या घटनेनंतर आता तुरुंग प्रशासनात देखील एकच खळबळ माजली आहे. तूर्तास या प्रकरणी कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र, या प्रकरणात लवकरच चौकशी देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी