कैलास पाटलांच्या उपोषणाची दखल न घेतल्याने उस्मानाबादमध्ये शेतकरी आक्रमक, बसची केली तोडफोड, पहा व्हिडीओ

In Osmanabad, farmers were aggressive, vandalized a bus ; कैलास पाटील यांच्या गेल्या 5 दिवसांपासून सुरु असलेल्या उपोषणाची दखल अद्यापपर्यंत घेतली न गेल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांनी वेगेवेगळ्या मार्गाने शासनाचे उपोषणाकडे लक्ष वेधण्याचे काम केले. मात्र, यावर अद्याप कुठलाही  निर्णय न झाल्याने  शेतकऱ्यांनी थेट बसेसची तोडफोड करण्यास सुरुवात केली आहे.

In Osmanabad, farmers were aggressive, vandalized a bus
उस्मानाबादमध्ये शेतकरी आक्रमक, बसची केली तोडफोड, पहा व्हिडीओ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उस्मानाबादमध्ये शेतकरी आक्रमक, बसची केली तोडफोड
  • गेल्या 5 दिवसांपासून सुरु आहे कैलास पाटील यांचं उपोषण
  • कैलास पाटील यांना पाठींबा देण्यासाठी तलावात जलसमाधी आंदोलन

उस्मानाबाद : पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना तात्काळ मिळावे, या मागणीसाठी शिवसेना ठाकरे (Uddhav Thakrey) गटाचे आमदार पाटील (Kailas Patil ) हे गेल्या 5 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा आणि अनुदानाचे पैसे येत नाहीत, तोपर्यंत उपोषणावरुन उठणार नसल्याचं आमदार कैलास पाटील यांनी, अशी ठाम भूमिका घेतली आहे. दरम्यान, कैलास पाटील यांच्या गेल्या 5 दिवसांपासून सुरु असलेल्या उपोषणाची दखल अद्यापपर्यंत घेतली न गेल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांनी वेगेवेगळ्या मार्गाने शासनाचे उपोषणाकडे लक्ष वेधण्याचे काम केले. मात्र, यावर अद्याप कुठलाही  निर्णय न झाल्याने  शेतकऱ्यांनी थेट बसेसची तोडफोड करण्यास सुरुवात केली आहे.

अधिक वाचा ; Optical Illusion: शोधून-शोधून थकला तरीही सापडला नाही बूट..

उस्मानाबाद – सोलापूर मार्गावर बसेस फोडल्या

समोर आलेल्या माहितीनुसार शेतकरी हे 2020 सालच्या पीकविमा न मिळाल्याने आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत. गेल्या 5 दिवसांपासून शेतकरी आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपलं आंदोलन  करत होते. मात्र, आता शेतकऱ्यांचा उद्रेक समोर येताना दिसत आहे. शेतकऱ्यांनी उस्मानाबाद - सोलापूर महामार्गावर बसेस फोडल्या असल्याची माहिती मिळाली आहे. उस्मानाबाद सोलापूर ही बस शेतकऱ्यांनी फोडली असल्याची माहिती समोर येत आहेत. सदर बसचा क्रमाक हा MH 20 बी एल 4269 असा आहे.

अधिक वाचा ; इलॉन मस्क आणि पराग अग्रवालचे संबंध का बिघडले, नेमके काय झाले 

कैलास पाटील यांना पाठींबा देण्यासाठी तलावात जलसमाधी आंदोलन

कैलास पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी आता उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी या गावाच्या ३० ते ४० शेतकऱ्यांनी थेट शेजारील तलावात जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत कैलास पाटील उपोषण मागे घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही देखील पाण्याचा बाहेर निघणार नसल्याचं आंदोलकांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा ; हा खेळाडू कसा बनला PAK च्या 22.5 कोटी लोकांसाठी व्हिलन?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी