Crime News वाद मिटवण्यासाठीची बैठक सुरू असताना सासरच्या मंडळींनी विवाहितेला पाजले विष

Attempt to kill a married woman by poisoning her ; बैठकीमध्ये तडजोड करणे ऐवजी सासरच्या मंडळीने तस्सलुम बेगम या विवाहितेला विष पाजले असल्याची तक्रार तस्सलुमच्या कुटुंबीयांनी पोलिसात दिली आहे. विष पाजल्यामुळे तस्सलुम बेगम या बेशुद्ध पडल्याने त्यांना नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले.

Attempt to kill a married woman by poisoning her
घरात बैठक सुरू असताना सासरच्या मंडळींनी विवाहितेला पाजले विष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पती-पत्नीचा सुरू असलेला वाद मिटवण्यासाठीची बैठक सुरु असताना विवाहितेला पाजले विष
  • विष पाजल्यामुळे तस्सलुम बेगम या बेशुद्ध पडल्या
  • विवाहितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले

परभणी : परभणी जिल्ह्यातून ( Parabhani District ) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पती-पत्नीचा सुरू असलेला वाद मिटवण्यासाठीची बैठक सुरु असतानाच सासरच्या मंडळींनी विवाहितेला चक्क विष पाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नातेवाईकांची बैठक बसली असतानाच सासरच्या मंडळीने विवाहितेस जीवे मारण्याच्या उद्देशाने विष पाजल्याची घटना परभणीच्या पाथरी शहरातील ( Pathari City ) राजनगर भागामध्ये घडली आहे. सदर घटनेनंतर सासरच्या मंडळी विरोधात पाथरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. तर विवाहितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पाथरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. (in parabhani district in laws tried to kill daughter in law giving poison )

अधिक वाचा ; अखंड भारताचे पहिले पंतप्रधान सुभाषचंद्र बोस : Rajnath Singh

विष पाजल्यामुळे तस्सलुम बेगम या बेशुद्ध पडल्या

मिलेलेल्या माहितीनुसार, सदर विवाहितेचे नाव तस्सलुम बेगम असं आहे. तस्सलुमचा सासरच्या मंडळीकडून अनेक दिवसांपासून छळ करण्यात येत होता. त्यामुळे तस्सलुमने तिच्या नातेवाईकांना सदर बाब सांगितली होती. त्यानंतर दोघा पती पत्नीमधील वाद मिटवण्याचा निर्णय दोघा कुटुंबाकडून घेण्यात आला. विवाहितेच्या काकाच्या घरी सदरील प्रकार मिटवण्यासाठी नातेवाईकांची बैठक बोलवण्यात आली होती. मात्र बैठकीमध्ये तडजोड करणे ऐवजी सासरच्या मंडळीने तस्सलुम बेगम या विवाहितेला विष पाजले असल्याची तक्रार तस्सलुमच्या कुटुंबीयांनी पोलिसात दिली आहे. विष पाजल्यामुळे तस्सलुम बेगम या बेशुद्ध पडल्याने त्यांना नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले. पाथरी येथे प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हलवण्यात आले होते. तस्सलुम बेगम यांनी दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या मंडळी विरोधात पाथरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा ; या एका शेअरवर मिळणार मोफत 9 शेअर्स, गुंतवणुकदारांच्या उड्या 

अधिक वाचा ; सुंदर आणि चमकदार केस हवे आहेत? मग करा हे घरगुती उपाय

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी